पोलीस ठाण्यासमोरच महिलेला अश्रू अनावर
पुणे : एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगी व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाचा नारा घेऊन सर्वत्र भगवेमय वातावरण करत असताना दुसरीकडे त्यांच्या या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याचे डी.वाय.एस.पी. व पोलीस निरीक्षक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडत असतानाही कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये याबाबत समस्त नागरिकांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर आपण सुरक्षित राहू तसेच आपल्या आया-बहिणीचे रक्षण होईल असा समज असताना त्याला हरताळ फासण्याचे काम राहुरी तालुक्यातील डी.वाय.एस.पी. शिवपुजे तसेच पीआय धनंजय जाधव हे दोन महाभाग करत असल्याचे सचित्र दिसून येत आहे. राहुरी सह श्रीरामपूर मध्ये मोठ्या प्रमाणात सर्रासपने अवैध व्यवसाय चालू आहेत एवढेच नव्हे तर पीआय हर्गषवर्धन गवळी तर बॉम्बस्फोट मधील आरोपी असलेल्या व्यक्तींना देखील संरक्षण देण्याचे काम करतात तसेच मागील काही महिन्यांपूर्वी चक्क एका महिलेला त्यांनी धक्काबुक्की देखील केली होती. त्याबाबत देखील केंद्रीय बालहक्क आयोग दखल घेणार आहे असे ‘प्रहार’ च्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तर दुसरीकडे श्रीरामपूर राहुरी तालुक्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व तक्रारींचा पाढा वाचूनही त्याकडे स्थानिक डीवायएसपी दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे तक्रारदार यांनी अर्ज, उपोषण, आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष करून आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही. अशा अविर्भावात श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील डी.वाय.एस.पी.शिवपूजे व पोलीस निरीक्षक असे वागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांची चुकीची वर्तवणूक सर्वसामान्यांना नागरिकांना दिसून येत आहे.
एकीकडे युपी व बिहार मध्ये गुंडाराज संपुष्टात येत असताना, महाराष्ट्रात शैक्षणिक आणि आर्थिक सक्षम असलेल्या नगर जिल्ह्यात हा प्रकार घडून येत असल्याने झपाट्याने काम करणाऱ्या आणि सर्वांना न्याय देणारे अशी ओळख असलेले एसपी महोदय करतात तरी काय असा सवाल हतबल झालेली व अन्यायग्रस्त जनता विचारताना दिसत आहे.
सविस्तर प्रकरण पुढील प्रमाणे –
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मौजे ब्राम्हणभावभांड येथील वडिलोपार्जित शेत हे राजकीय पुढारी व त्यावे भूमाफिया यांनी मिळकतीचा ताबा देण्यासाठी वीस लाखाची खंडणी घेतली आहे. आणखी अतिरिक्त आठ लाख खंडणीची मागणी करत शेतजमीनीचा ताबा सोडत नसल्याबाबतची तक्रार माजी सैनिक पत्नी शामा आशिष बनसोडे यांनी सुरेद्र थोरात ता. राहुरी देवळालीप्रवरा जि. अहमदनगर व प्रतिवादी विलास शिरसाट, कैलास शिरसाट माँ ब्राम्हणगावभांड ता. राहुरी यांच्याबाबत नगर पोलीस DYSP आणि पीआय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मौजे ब्राम्हणगाव भांड, ता. राहुरी जि. अहमदनगर येथील ग.नं 184, शेतजमीन अर्जदार हिची वारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित मिळकत आहे. मिळकतीबाबत प्रतिवादी विलास शिरसाट याने नाव साधर्माचा फायदा घेऊन खोटी बनावट कागदपत्रे बनून मिळकतीचा एकटा वारसदार आहे. असे दाखविले होते. तसा आदेश न्यायालयाने दिलेला असताना त्या विरोधात पोलीस अधिक्षक, जि. अहमदनगर, यांच्याकडे वेळोवेळी तक्रार अर्ज केले.
डी.वाय.एस.पी.शिवपूजे यांना वेळोवेळी भेटण्यासाठी पीडित महिला गेली असता तिला बसवून ठेवत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे या संदर्भात काही आर्थिक लागेबांधे तर नाहीत ना..?? अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज.क्र. 88/2022 आवक न./6814/2022 तसेच राहुरी पो.स्टे.जा.क्र. 100/2022. दि. 07/07/2022, पोलीस बंदोबस्त आपल्या अधीक्षक कार्यालयाकडून दि. २७/०१/२३ रोजी राहुरी पोलीस कार्यालयास सशुल्क बंदोबस्त जा. क्र.१४३३६ /२०२२ दि.०६/१२/२०२२,02/02/2023 पेड बंदोबस्त टिपणी 2023/266 रोजीचा पोलीस बंदोबस्त मंजूर झालेला असताना त्यांना बंदोबस्त मिळाला नाही. याउलट पीआय यांनी महिलेसोबत अरेरावी करत त्यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढले. तसेच समोरच्या विरोधी पक्षातील व्यक्तींना समोर बोलून त्यांनी पीडित महिलेला शिवीगाळ केली. तरीही पीआय धनंजय जाधव मात्र सर्व प्रकार बघत राहिले त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही.
एस पी साहेब सध्या जिल्ह्यात खूप सुंदर काम करत आहेत असे चित्र एकीकडे असताना मात्र पीआय आणि डीवायएसपी चुकीचे कामे करत असल्याचे दिसत असल्याचे स्थानिकांमध्ये चर्चा असल्याचे समजते. तसेच सुरेंद्र थोरात या व्यक्तीला पोलीस का वाचवीत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी याबाबत सर्व विषयाला घेऊन येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो अशी सूत्रांच्या माहिती नुसार प्रहार ला समजली आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात काय होतें हे बघायचे ठरेल. त्यामुळे DYSP आणि पीआय यांच्यावर कारवाही व्हावी असा तालुक्यात एकंदरीत सुर असल्याचे दिसते