Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Fighter : अ‍ॅनिमल का बाप अनिल कपूर पुन्हा ऍक्शन करण्यासाठी सज्ज!

Fighter : अ‍ॅनिमल का बाप अनिल कपूर पुन्हा ऍक्शन करण्यासाठी सज्ज!

कॅप्टन राकेश जयसिंगच्या भूमिकेत 'फाइटर' मधून झळकणार!

मुंबई : अनिल कपूरचा 'फायटर' चा लूक प्रेक्षकांच्या भेटीला अ‍ॅनिमलने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडला आणि चित्रपट ५०० कोटींच्या क्लबच्या मध्ये सामील झाला आहे. मेगास्टार आणि 'बॉलिवुडचा बाप' अनिल कपूर सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्ये आणखी एका वेगळ्या भूमिकेसह प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे. 'नाईट मॅनेजर' अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर रॉकी उर्फ ​​ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंग या व्यक्तिरेखेची ओळख करून देणारं दमदार पोस्टर पोस्ट केलं आहे.

अनिल कपूर सध्या जोरदार चर्चेत असून जुग जुग जीयो, द नाईट मॅनेजर आणि आता अ‍ॅनिमलच्या सध्याच्या मोठ्या यशासह हा 'अनिमल का बाप' त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

फायटरमधील रॉकीच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तो तयार होत आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून आणि त्याचे प्रोडक्शन हाऊस, मार्फ्लिक्स पिक्चर्स निर्मित आहे. अनिल कपूर व्यतिरिक्त यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत हा चित्रपट २०२४ च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment