मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला बरेचसे रिचार्ज प्लानचे पर्याय मिळतात.कंपनी काही खास प्लान्स देते जे कमी किंमतीत तुम्हाला लॉग टर्म व्हॅलिडिटीसोबत येतात. म्हणजेच कमी किंमतीत तुम्हाला दिवसांची व्हॅलिडिटी जास्त मिळते. तसेच फायदेही अनेक असतात.
लाँग टर्म व्हॅलिडिटी
अशाच एका प्लानबद्दल आम्ही बोलत आहोत जे कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक फायद्यांसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला लाँग टर्म व्हॅलिडिटी मिळते.
किती आहे किंमत
हा प्लान १७९९ रूपयांचा आहे यात युजर्सला २४ जीबी डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळतो. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर फायदे मिळतात.
इतकी मिळणार व्हॅलिडिटी
यात युजर्सला ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान ३६०० एसएमएसह येतो. दरम्यान एका दिवसात युजर्स १०० पेक्षा जास्त एसएमएसचा वापर करू शकत नाहीत.
काय आहेत अतिरिक्त फायदे?
अतिरिक्त फायद्यांबाबत बोलायचे झाल्यास यात Apollo 24|7 Circleचे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच फ्री हॅलो ट्यूनही मिळेल.
कोणासाठी आहे फायदेशीर?
हा प्लान त्या युजर्ससाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी हवी आहे. खासकरून कॉलिंगसाठी एक प्लान घेत असाल तर हा ऑप्शन बेस्ट आहे.
खरेदी करू शकता अतिरिक्त डेटा
दरम्यान, युजर्स हवे असल्यास या प्लानमध्ये तुम्ही गरजेनुसार अतिरिक्त डेटाचे रिचार्ज करू शकता.