Tuesday, July 16, 2024
Homeदेशभारतात २०२२मध्ये केवळ वीज कोसळल्याने ३५ टक्के मृत्यू

भारतात २०२२मध्ये केवळ वीज कोसळल्याने ३५ टक्के मृत्यू

नवी दिल्ली: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नव्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये नैसर्गिक दुर्घटनांमुळे ८०६० लोकांचा अपघाती मृत्यू झाला. जसे हीटस्ट्रोक, वीज कोसळणे, पुरात वाहून जाणे इत्यादी. मात्र हैराणजनक बाब म्हणजे यातील ३५ टक्के मृत्यू हे वीज कोसळल्याने झाले आहे. हा खुलासा एसीआरबीच्या एक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड्स इन इंडियामध्ये झाला आहे.

देशात गेल्या वर्षी ९.१ टक्के अपघाती मृत्यू हे हीट स्ट्रोक आणि सनस्ट्रोकमुळे झालेत. म्हणजे भयंकर उकाडा. तर ८.९ टक्के थंडीमुळे गेले. मृ्त्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये ३२.१ टक्के लोक हे ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे आहेत. तर २३.७ टक्के लोक ३० ते ४५ वयादरम्यान आहेत.

वीज कोसळल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात वीज कोसळल्याने ४९६ जण मृ्त्यूमुखी पडले तर बिहारमध्ये ३२९, ओडिशामध्ये ३१६, उत्तर प्रदेशात ३०१ आणि झारखंडमध्ये २६७ लोकांचा जीव गेला. ही पाच राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचा जीव गेला. सर्वाधिक मृत्यू या राज्यांमध्ये झाले आहेत.

जर मेगासिटी म्हणजेच मोठ्या शहरांबाबत बोलायचे झाल्यास मृत्यूमुखी पडलेल्या ८०६० लोकांमध्ये केवळ ६७० लोक मोठ्या शहरातील आहेत. म्हणजेच ८.७ टक्के. गेल्या वर्षात देशातील विविध प्रकारच्या अपघातात ३,९७,५३० लोकांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक लोक मारले गेले ते ३०-४५ वयोगटातील. यांची संख्या १,३२,८४६ इतकी होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -