लंडन: ब्रिटनच्या ऋषी सुनक(rishi sunak) सरकारने आपल्या व्हिसा पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. याचा हेतू कायदेशीररित्या ब्रिटनमध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करणे आहे. बदलांतर्गत ब्रिटनमध्ये राहून काम करणारे परदेशी नागरिक आता आपल्या कुटुंबियांना सोबत नेऊ शकणार नाही. हा भारतीयांसाठी मोठा झटका मानला जात आहे.
काय आहेत नवे नियम?
नियमांच्या बदलानंतर आता ज्या लोकांना ब्रिटनमध्ये जाऊन काम करायचे आहे त्यांना वर्क व्हिसा तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांचा पगार जास्त असेल. ब्रिटनचे गृहमंत्री जेम्स क्लेव्हरली यांनी संसदेत सांगितले की स्किल्ड वर्कर अंतर्गत व्हिसा मिळवायचा असेल तर कमीत कमी पगार ३८,७०० पाऊंड(४०.७३ लाख रूपये) असला पाहिजे. याआधी ही मर्यादा २६,२०० पाऊंड इतकी होती.
याच पद्धतीने फॅमिली व्हिसा कॅटेगरीमध्ये अप्लाय करण्यासाठी कमीत कमी पगार वाढवून ३८,७०० पाऊंड इतका केला आङे. याआधी ही मर्यादा १८,६०० पाऊंड इतकी होती. दरम्यान, या अटी हेल्थ आणि सोशल केअर संबधित क्षेत्रात नोकरी करणाऱ्या परदेशी कामगारांना लागू असणार नाही. मात्र तेही आपल्या संपूर्ण कुटुंबांना युकेला नेऊ शकत नाहीत.
का घेतला निर्णय?
ब्रिटन दीर्घकाळापासून वाढत्या परदेशी नागरिकांमुळे त्रस्त आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परदेशातून येणाऱ्या वाढत्या नागरिकांच्या संख्येला कमी कऱण्यासाठी व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. जेम्स क्लेव्हरली यांनी संसदेत सांगितले नव्या व्हिसा नियमांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी तीन लाख लोक कमी आले. हे नवे नियम २०२४च्या फर्स्ट हाफमध्ये लागू होतील.
याआदी या वर्षी मे मध्ये तत्कालीन गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅननेही स्टुडंट व्हिसाबाबत नवे नियम सादर केले होते. या नियमांतर्गत स्टुडंड व्हिसाच्या मदतीने ब्रिटनमध्ये येणारे विद्यार्थी आपल्या कुटुंबाला तेव्हाच आणू शकतात जेव्हा ते एखाद्या खास युनिर्व्हसिटीमध्ये पीजी कोर्स करत असतील.
भारतीयांवर होणार परिणाम
काम आणि अभ्यासासाठी दरवर्षी हजारो भारतीय नागरिक ब्रिटनमध्ये जात असतात. आकड्यांनुसार हेल्थ केअर व्हिसा घेणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत ७६ टक्के वाढ झाली आहे. स्टुडंट व्हिसा कॅटेगरीमध्ये भारतीयांचा दबदबा आे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत १,३३,२३७ भारतीय विद्यार्थ्यांना स्टुडंट व्हिसा देण्यात आला.