मुंबई: जिओने(jio) ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असा ९१ रूपयांचा रिचार्ज आणला आहे. जिओचे अनेक रिचार्ज प्लान आहेत जे विविध कॅटेगरी आणि फायद्यांसह येतात. आज आम्ही तुम्हाला खास रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत.
९१ रूपयांचा रिचार्ज प्लान
आज आम्ही तुम्हाला ९१ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि खूप सारे फायदे मिळतील.
किती दिवसांची व्हॅलिडिटी
जिओच्या ९१ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांची व्हॅलिडिटी पाहायला मिळते.
किती मिळणार डेटा?
जिओच्या या प्लानणध्ये युजर्सला डेली ०.१ जीबी डेटा वापरण्यास मिळेल. याशिवाय २०० एमबीचाही अॅक्सेस मिळेल. या प्लानमध्ये केवळ एकूण ३ जीबी डेटा मिळेल.
मिळणार अनलिमिटेड कॉल
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंगचेही फायदे मिळतील. यात लोकल आणि एसटीडी कॉलचाही समावेश आहे.
जिओ फोनचा प्लान
जिओचा ९१ रूपयांचा रिचार्ज प्लान केवळ जिओफोन युजर्ससाठी आहे. हा प्लान स्मार्टफोन युजर्ससाठी व्हॅलिड नाही.
या अॅप्सचा अॅक्सेस मिळणार
जिओफोन युजर्सला काही मोजक्या अॅप्सचा अॅक्सेस मिळणार आहे. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड यांचा समावेश आहे.
किती मिळणार एसएमएस?
जिओच्या या रिचार्जमध्ये युजर्सला ५० एसएमएस अॅक्सेस करण्यासाठी मिळतील. दरम्यान ही संख्या अनेकांना कमी वाटू शकते.
स्मार्टफोनसाठी रिचार्ज
स्मार्टफोन युजर्ससाठी १४९ रूपयांचा जिओचा रिचार्ज प्लान आहे. हा प्लान २० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात युजर्सला दररोज १ जीबी इंटरनेट डेटा अॅक्सेस करता येतो.