भाजपाचा परखड सवाल
मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमध्ये (Assembly Elections) काँग्रेस (Congress) एकट्या तेलंगणामध्ये विजय मिळवू शकली, तर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा (BJP) दणदणीत विजय झाला. यावर विरोधक ईव्हीएम मशीनवर (EVM Machine) शंका उपस्थित करत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील भाजपवर टीका केली होती. त्याला आता भाजपने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन (X Account) एक पोस्ट करत भाजपाने उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
भाजपाच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे, अशी जहरी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 5, 2023
पुढे या पोस्टमध्ये लिहिले आहे, कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे, किती रडारड करणार?, असा परखड सवाल उपस्थित करत भाजपाने उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.