मुंबई: मिचाँग चक्रीवादळामुळे(Cyclone Michuang) चेन्नईत(chennai) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पाणी पाणी झाले आहे. यातच चेन्नईतून आणखी एक बातमी समोर आली आहे की बॉलिवूड अभिनेता आमिर खानही(aamir khan) या चक्रीवादळामुळे गेल्या २४ तासांपासून चेन्नईत अडकला आहे. त्याच्यासोबत अभिनेता विष्णू विशालही आहे.
२४ तासांनी आमिर खान आणि विष्णू विशाल यांना केले रेस्क्यू
नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत. यात अग्निशमन दल आणि बचाव विभागाने आमिर खानला रेस्क्यू केले. आमिरसोबत अभिनेता विष्णू विशालही या वादळात अडकले होते. दोघांना २४ तासांनी सहीसलामत बाहेर काढले.
विष्णू विशालने शेअर केले वादळाचे फोटो
याची माहिती खुद्द विष्णू विशालने आपल्या एक्स अकाऊंटवर काही फोटो शेअर करत दिली आहे. आमिर खान आणि बचाव विभागासोबतचे काही फोटो शेअर करत विष्णू विशालने कॅप्शनमध्ये लिहिले, आमच्यासारख्या अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अग्निशमन विभाग तसेच बचाव पथकाचे धन्यवाद. सोबतच त्या लोकांचेही धन्यवाद जे सातत्याने आम्हाला सोडवण्यासाठी काम करत आहे. फोटोत आमिर खान आणि विष्णू एका बोटीत बसलेले दिसत आहे.
Thanks to the fire and rescue department in helping people like us who are stranded
Rescue operations have started in karapakkam..
Saw 3 boats functioning alreadyGreat work by TN govt in such testing times
Thanks to all the administrative people who are working relentlessly https://t.co/QdoW7zaBuI pic.twitter.com/qyzX73kHmc
— VISHNU VISHAL – VV (@TheVishnuVishal) December 5, 2023
दाक्षिणात्या अभिनेत्यांनी केली १० लाखांची मदत
मिळालेल्या माहितीनुसार दाक्षिणात्य अभिनेते सूर्या आणि कार्ति यांनी चेन्नईतील लोकांच्या मदतीसाठी १० लाखांची मदत केली आहे.