मुंबई: सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी(ms dhoni) दिसत आहे. खरंतर माही आपल्या मित्राच्या बर्थडेला मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांना कॅप्टन कूलचा हा अंदाज खूप आवडला आहे. याशिवाय सोशल मीडियावर युजर्स सातत्याने कमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ महेंद्रसिंग धोनीशिवाय त्याचे ३ मित्र दिसत आहेत. माहीचे मित्र त्याला केक भरवत आहेत. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.
View this post on Instagram
आयपीएल २०२४मध्ये खेळणार माही
काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. खरंतर आयपीएल २०२४ हंगामात धोनी खेळताना दिसणार आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाले की माही आगामी आयपीएलमध्ये खेळणार आहे. याआधी २०२४च्या हंगामात खेळणार की नाही याबाबत संशय होता. मात्र आता स्पष्ट झालेय तो चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालून मैदानात दिसणार आहे. महेंद्र सिंग धोनीने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. मात्र तो अद्याप आयपीएलमध्ये खेळत आङे. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. धोनीच्या आयपीएल करिअरवर नजर टाकल्यास त्याने आतापर्यंत २५० सामने खेळले आहेत. धोनीशिवाय तो रायजिंग पुणे सुपर जायंट्ससाठी खेळला आहे.