Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Ruturaj Gaikwad: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास, दिग्गजांना टाकले मागे

Ruturaj Gaikwad: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास, दिग्गजांना टाकले मागे

मुंबई: ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने भारतीय दिग्गजांसह जगभरातील सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ५५.७५च्या सरासरीने आणि १५९.२९च्या स्ट्राईक रेटने एकूण २२३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नाबाद १२३ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.


क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलच्या नावावर होत्या मात्र ऋतुराजने त्यालाही मागे टाकले आहे. याशिवाय या यादीत भारताच्या युवा फलंदाजाने विराट कोहली आणि डेवॉन कॉन्वेलाही मागे टाकले आहे.



टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


ऋतुराज गायकवाड - २२३ धावा
मार्टिन गप्टिल - २१८ धावा
विराट कोहली - १९९ धावा
डेवॉन कॉन्वे - १९२ धावा



भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


भारतासाठी एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करत ऋतुराज गायकवाडने त्यालाही मागे टाकले आहे. या यादीत सर्वात पहिल्या स्थानावर विराट कोहली, त्यानंतर केएल राहुल आणि मग ऋतुराज गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन खेळाडूंनी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा कऱण्याचा रेकॉर्ड केला आहे.


विराट कोहली - २३१ धावा विरुद्ध इंग्लंड
केएल राहुल - २२४ धावा विरुद्ध न्यूझीलंड
ऋतुराज गायकवाड - २२३ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Comments
Add Comment