Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडी'IPhone 15' फक्त ४० हजारांत! कसं काय?

‘IPhone 15’ फक्त ४० हजारांत! कसं काय?

जाणून घ्या ऑफर्स…

मुंबई : भारतात सध्या आयफोनची (IPhone) प्रचंड क्रेझ आहे. अगदी परवडत नसताना देखील लोक कर्ज काढून आयफोन विकत घेताना दिसतात. तसंच भारतातील आयफोन्सची मागणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. पण सामान्यतः हे आयफोन्स घेणं खूप महाग असतं. यांची सुरुवातच ३५ हजारांपासून होते. त्यातही आयफोन १५ (IPhone 15) घ्यायचा झाला तर ८० हजार रुपये मोजावे लागतात.

नुकतीच आयफोन १५ घेऊ इच्छिणार्‍यांसाठी एक झक्कास ऑफर आली आहे. ज्यामुळे तुम्ही अगदी ४० हजारांत आयफोन १५ खरेदी करु शकता. ॲपलच्या (Apple) आयफोन १५ साठी ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर (Flipkart) एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) आणि बँक ऑफर्स (Bank Offers) देखील दिले जात आहे. त्यामुळे आता आयफोन १५ स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

ॲपलच्या आयफोन १५ ची १२८ जीबीची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. ॲमेझॉनवर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर पाच हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय मोबाइल फोनवर ३४ हजार ५०० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही दिला जात आहे. जर तुमचा जुना फोन पूर्णपणे नवीन स्थितीत असेल किंवा तुमच्याकडे गॅलेक्सी फोल्ड किंवा एस २३ वगैरे दुसरा प्रीमियम फोन असेल तर तुम्हाला चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. सर्व डिस्काउंट मिळाल्यानंतर तुम्ही आयफोन १५ फक्त ३६ हजार ४०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

कसा आहे आयफोन १५?

आयफोन १५ च्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, यात ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि A 16 बायोनिक चिपचा सपोर्ट आहे. फोनमध्ये 4X रिझोल्यूशनसह नवीन 48 MP मुख्य कॅमेरा, तसेच 12 MPचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. वेगवान डेटा ट्रान्सफर स्पीडसाठी आयफोन १५ यूएसबी 3.2 Gen 5 सपोर्ट करतो.

जाणून घ्या भारतातील ॲपल १५ सीरीजची (Apple 15 Series) किंमत

iPhone 15 (128 GB): 79,900 रुपये
iPhone 15 (256 GB): 89,900 रुपये
iPhone 15 (512GB): 1,09,900 रुपये

iPhone 15 Plus (128 GB): 89,900 रुपये
iPhone 15 Plus (256 GB): 99,900 रुपये
iPhone 15 Plus (512 GB): 1,19,900 रुपये

iPhone 15 Pro(128 GB): 1,34,900 रुपये
iPhone 15 Pro(256 GB): 1,44,900 रुपये
iPhone 15 Pro(512GB): 1,64,900 रुपये
iPhone 15 Pro (1 TB): 1,84,900 रुपये

iPhone 15 Pro Max (256 GB): ₹,59,900 रुपये
iPhone 15 Pro Max (512 GB): 1,79,900 रुपये
iPhone 15 Pro Max (1 TB): 1,99,900 रुपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -