मुंबई: भारतीय संघाने पाचव्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेटनी हरवले. भारताने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियातून हातून विजयाचा घास खेचून घेतला. सामन्यात अर्शदीप सिंह भारताच्या विजयासाठी हिरो ठरला. त्याने शेवटच्या षटकात मॅथ्यू वेड आणि नाथन एलिससमोर १० धावा वाचवल्या. भारताच्या या विजासह अनेक रेकॉर्डही झाले.
भारत वि ऑस्ट्रेलिया टी-२०मध्ये सगळ्यात कमी फरकाने विजय
४ धावा(DLS)- ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन २०१८
६ धावा – भारत, बंगळुरू, २०२३
११ धावा – भारत, कॅनबेरा २०२०
१२ धावा – ऑस्ट्रेलिया, सिडनी २०२०
१५ धावा – भारत, डर्बन २००७
घरच्या जमिनीवर भारताचे टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टोटल डिफेन्ड
या पाच सामन्यांच्या टी-२- मालेकआधी ४ पैकी ४ गमावले
या मालिकेत ४ पैकी ३ विजय
भारताविरुद्ध टी-२०मध्ये सर्वाधिक धावा
५९२ धावा – निकोलस पूरन
५५४ धावा – ग्लेन मॅक्सवेल
५०० धावा – आरोन फिंच
४८७ धावा- मॅथ्यू वेड
४७५ धावा – जोस बटलर
टी-२०मध्ये एका संघाविुरुद्ध सर्वाधिक विजय
२० सामने – पाकिस्तान वि न्यूझीलंड
१९ सामने – भारत वि ऑस्ट्रेलिया
१९ सामने – भारत वि श्रीलंका
१९ सामने – भारत वि वेस्ट इंडिज
मालिकेत भारतीय स्पिनर्सची कमाल
भारतीय स्पिनर्स – १५ विकेट
ऑस्ट्रेलियन स्पिनर्स – ६ विकेट
मालिकेत युवा भारतीय संघाची कमाल
विश्वचषक २०२३नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका टीम इंडियासाठी पहिली असाईन्मेंट होती. यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. अशातच सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्व सोपवण्यात आले होते.