मुंबई: थंडीच्या दिवसांत शरीराला एनर्जी देणारे तसेच स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे शेंगदाणे अतिशय आवडीने खाल्ले जातात. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत शेंगदाणे खाण्याचे बरेच फायदे…
कोलेस्ट्रॉल लेव्हल बॅलन्स करतात
तुम्हाला जाणून घेतल्यावर हैराणजनक वाटेल की शेंगदाण्याच्या सेवनाने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
सर्दी-खोकल्यापासून बचाव
शेंगदाण्यामध्ये आढळणारे व्हिटामिन सी सर्दी-खोकल्यापासून बचाव कऱण्यात फायदेशीर ठरते तसेच इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करते.
डायबिटीजचा धोका होतो कमी
आरोग्य तज्ञांच्या मते मर्यादित प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्याने डायबिटीजचा धोका कमी होण्यास मदत होते.
प्रेग्नंसीमध्ये फायदेशीर
प्रेग्नंसीच्या सुरूवातीला डॉक्टरांच्या सल्ल्याने शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या बाळाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
वजन कमी करण्यात फायदेशीर
थोड्याच्या शेंगदाण्याच्या सेवनाने तुम्ही वाढत्या वजनावरही नियंत्रण मिळवू शकता.
कमी होतो कॅन्सरचा धोका
शेंगदाण्यामध्ये आढळणारी पोषक तत्वे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यात मदत करतात.
शेंगदाण्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स, न्यूट्रिएंट आणि अँटी ऑक्सिडंट आढळतात ज्यामुळे आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
दरम्यान, हे जरूर लक्षात ठेवा की शेंगदाण्याच सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास त्याचे बरेच फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात.