Sunday, July 7, 2024
HomeदेशAssembly Election Results:राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात कोण होणार मुख्यमंत्री? हे...

Assembly Election Results:राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात कोण होणार मुख्यमंत्री? हे आहेत संभाव्य चेहरे

नवी दिल्ली: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत तीन ठिकाणू भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेस संपूर्ण बहुमताने सरकार बनवत आहे. मध्य प्रदेशात भाजपचा बंपर विजय झाला तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही यावेळी कमळ फुललले. तेलंगणामध्ये गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या केसीआरला यावेळी झटका बसला. येथे काँग्रेसने विजय मिळवला. आता सवाल आहे की या राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण बनणार?

मध्य प्रदेशमध्ये शिवराज यांना मिळू शकते ही जबाबदारी

मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा ताज शिवराम यांच्या माथ्यावर बसू शकतो. ते राज्ायातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. शिवराज बुधनी विधानसभा येथून निवडणूक लढवत होते. २००६ पासून येथे त्यांचा दबदबा राहिला आहे. शिवराज यांनी १९९० मध्ये येथून विजय मिळवला होता. त्यानंतर २००६मध्ये ते पु्न्हा बुधनी येथून जिंकून आले होते. आतापर्यंत त्यांचा या मतदारसंघावर कब्जा राहिला आहे. ते मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री आहेत.

राजस्थानात महंत बालकनाथ यांना मिळू शकते संधी

राजस्थानात भाजपचे आमदार महंत बालकनाथ या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच महंत बालकनाथ हे नाथ समुदायाचे आहेत आणि त्यांच्या संसदीय क्षेत्रात मोठ्या संख्येने त्यांना मानणारे तसेच समर्थक आहेत. भाजपकडून ते तिजारा मतदारसंघातू निवडून आले. येथे त्यांनी काँग्रेसच्या इमरान खानला हरवले. राजस्थानात काँग्रेसपासून लोकांना मुक्ती हवी होती त्याच मुळे भाजपला हा विजय सोपा झाला असे बालकनाथ म्हणाले. ४० वर्षीय बालकनाथ यांनी वयाच्या ६व्या वर्षी संन्यास घेतला होता.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही शर्यतीत

राजस्थानात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारामध्ये भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही यांचेही नाव घेतले जात आहे. त्या अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होत्या. दरमा्यान, त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

माजी मुख्यमंत्री रमण सिंह बनू शकतात पुन्हा मुख्यमंत्री

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रमण सिंह मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. १९६६-६७मध्ये त्यांचे राजकीय करिअर सुरू झाले होते. २००३मध्ये ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनले होते. ते तीन वेळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनले आहेत. ते २००८ पासून राजनांदगाव मतदारसंघातू निवडून येत आहेत.

तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार

तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात पक्षाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. तसेच १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला धक्का दिला. पक्ष कार्यकर्त्यांकडून रेड्डी यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. त्यातच चर्चा आहे की त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -