साप्ताहिक राशिभविष्य, दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३
|
प्रलोभने टाळा
मकर:
नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवृद्धी होईल. त्याबरोबर आपल्या अधिकारातही वाढ होईल. मात्र जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. कामाच्या स्वरूपात बदल घडून स्थानाच्या स्वरूपातही बदल घडू शकतो. सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा लागेल तसेच बदलीची शक्यता आहे. आपण आपल्या अधिकाराच्या मर्यादा ओळखून आपले कार्य पूर्ण करणे हिताचे ठरेल तसेच लहान-मोठी प्रलोभने टाळा. कामानिमित्त अथवा काही कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागेल. कुटुंबातील मुलांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. काही वेळेस मतभेदांची शक्यता. आपला क्रोध नियंत्रणात ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या राहतील. त्यासाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो.
|
 |
मुक्तहस्ते खर्च कराल
कुंभ:
धनलाभाच्या दृष्टिकोनातून चांगला काळ आहे. अनेक अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. नेहमीच्या उत्पन्न स्त्रोतांपेक्षा नवीन मार्गाने पैसा हाती येईल. त्यामुळे आनंदित राहाल. कुटुंबासाठी तसे स्वतःसाठी मुक्तहस्ते खर्च कराल. धार्मिक कार्यात भाग घेऊन दानधर्म करण्याची इच्छा होईल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. धावपळ करावी लागेल. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. मात्र काही वेळा सुखद अनुभव येतील. चालू नोकरीपेक्षा जास्ती चांगली नोकरी शोधण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. सरकारी नोकरीत मानसन्मानाचे योग आहेत. आपले म्हणणे इतरांना पटवून देण्यात आपण यशस्वी व्हाल. आपला प्रभाव इतरांवर राहील. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग. |
|
आर्थिक बाजू बळकट होईल.
मीन:
कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास घडू शकतात. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. आपण केलेल्या कामाचे बक्षीस मिळेल. पदोन्नती वेतनवाढ होऊ शकते. मात्र बदलीची तयारी ठेवावी लागेल. कामाच्या स्वरूपातही बदल घडू शकतो. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील तसेच बरोबरच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक आघाडीवर समाधानी राहाल. कुटुंबात मंगल कार्य घडेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. आर्थिक बाजू बळकट होईल. मालमत्तेच्या कामात यश संपादित करू शकाल. जुन्या गुंतवणुका आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल. मात्र ती करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरेल. |