Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीराजकारण सोडण्याच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी घेतली भेट

राजकारण सोडण्याच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी घेतली भेट

ऍड. सहाणे यांच्यासारख्या उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तींची विद्यमान राजकारणाला गरज:आ. भारतीय

नाशिक (प्रतिनिधी)– विद्यमान राजकारणाचा घसरलेला दर्जा लक्षात घेता उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्वांनी राजकारणात सक्रिय होणे ही लोकशाहीची अपरिहार्यता आहे.पक्ष कुठलाही असेल, प्रत्येक पक्षाला अशा कार्यकर्त्यांची, नेत्यांची आज गरज आहे आणि म्हणूनच राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवू पाहणारे नाशिकच्या राजकारणातील उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि मितभाषी ऍंड शिवाजी सहाणे यांची सदिच्छा भेटू घेऊन त्यांचे मन आणि मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आ. श्रीकांत भारतीय यांनी आज नाशिकमध्ये दिले.

शनिवारी सायंकाळी आ. भारतीय नाशिक दौऱ्यावर आले असता, कुठलेही नियोजन नसतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करीत असलेले ऍड शिवाजी सहाणे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांसोबत जेवण केल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडून विविध चर्चेला उधाण आले आहे. या अनुषंगाने आ. भारतीय यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

आ. श्रीकांत भारतीय म्हणाले की, ऍड शिवाजी सहाणे हे भारतीय कुटुंबाचे जुने स्नेही आहे सहाणे, भारतीय कुटुंबियांमध्ये पारिवारिक स्नेहबंध आहेत. याशिवाय ते स्वतः एक उच्च शिक्षित, सुसंकृत तत्ववादी राजकारणी म्हणून ओळखले जातात. आमची मैत्री राजकारणा पलीकडची असून दोन्ही बाजूने आम्ही ती जपत आहोत.

ऍड सहाणे यांचा उच्च शिक्षित सुसंकृतपणा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वैशिष्ट्यामुळेच गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघात ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतांनाही भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता.ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी राजकारणात सक्रिय असावे, त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची राजकारणाला गरज आहे. हा संदेश देणे एवढाच या भेटीचा उद्देश होता आणि आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -