मुंबई: लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठे बक्षीस दिले आहे. इंश्युरन्स कंपनीने नॉन पार्टिसिपेटिंग मनी बॅक पॉलिसी सादर केली आहे. या स्कीमचे नाव जीवन उत्सव(jeevan utsav) आहे. यात गॅरंटेड रिटर्न मिळतात तसेच एक नॉन पार्टिसिपेट, नॉन लिंक्ड, पर्सनल सेव्हिंग आणि पूर्णपणे एक विमा योजना आहे.
जीवन उत्सव विमा योजनेंतर्गत कliमीत कमी विमा राशी ५ लाख रूपये आहे. प्रीमियम भरणा पाच ते १६ वर्षांपर्यंत आहे. जर तुमचे वय ८ वर्षे आहे तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. तसेच अधिकाधिक वय ६५ वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये दोन पद्धतीचे भरण्याचे पर्याय आहेत यात नियमित इन्कम आणि फ्लेक्सी इनकमचे लाभ मिळतात. यातील तुम्ही कोणत्याही पद्धतीची निवड करू शकता.
पेश है एलआईसी का जीवन उत्सव – आजीवन गारंटीड रिटर्न तथा लाभ चुनने के विकल्प के साथ पूर्ण आयु जीवन बी
*शर्तें लागू#LIC #LICJeevanUtsav #JeevanUtsav #WholeLifePlan pic.twitter.com/77kvgWbtBX
— LIC India Forever (@LICIndiaForever) November 29, 2023
५.५ वार्षिक व्याज
एलआयसीच्या नव्या जीवन पॉलिसीअंतर्गत तुमच्याकडे दोन पेमेंट ऑप्शनला स्थगित करण्याचे आणि उरलेल्या शेअरवर व्याज घेण्याची सुविधा असेल. एलआयसी या स्थगित लाभांवर ५.५ टक्के दरवर्षी व्याज देईल.
पॉलिसीअंतर्गत मृत्यू लाभ
पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियातील सदस्य अथवा नॉमिनीला याचा लाभ दिला जाईल. मृत्यूनंतर विमा राशीइतका याचा लाभ मिळेल आणि यासोबतच तोपर्यंत मिळालेल्या लाभाचे एक्स्ट्रा गॅरंटीही दिला जाईल.