Thursday, July 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाजछोट्या - मोठ्या सर्वांसाठी, ‘सुंदर ती दुसरी दुनिया’

छोट्या – मोठ्या सर्वांसाठी, ‘सुंदर ती दुसरी दुनिया’

ऐकलंत का!: दीपक परब

सध्याच्या सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या आभासी युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत चालली आहेत. मे महिन्यासोबतच सुट्टीच्या दिवसांत मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंदडणे, विटीदांडू, चोर-पोलीस, साखळीसाखळी असे अनेक खेळ तर हल्ली कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावेही माहित नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरू आहे. या सगळ्यात मुलांची हरवलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ हे धमाल नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला आले आहे. वेध थिएटर निर्मित, अपूर्वा प्रॉडक्शन प्रस्तुत या दोन अंकी महाबालनाट्यात एकूण ६० बालकलाकार आहेत. डॉ. समीर मोने लिखित या नाटकाची संकल्पना संकेत ओक यांची असून निर्मिती सुमुख वर्तक यांनी केली आहे, तर टीम वेधने ‘सुंदर ती दुसरी दुनिया’चे दिग्दर्शन केले आहे.

लहान मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी ही कलाकृती असल्याने प्रत्येक पाल्याने, पालकांनी आणि नाट्यप्रेमींनी आवर्जून पाहावे, असे हे नाटक आहे. नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रत्येक बालक एक सकारात्मक संदेश घेऊन निघेल. ठाणे, डोंबिवलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता या नाटकाचा पुढील प्रयोग रविवार ३ डिसेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह आणि १७ डिसेंबर रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे.

विशेष म्हणजे या नाटकात आणखी एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे प्रत्येक प्रयोगागणिक या बालनाट्यात बालकलाकार वाढणार आहेत. १७ डिसेंबरच्या प्रयोगात १२० बालकलाकार रंगत आणणार आहेत. अनेकांनी या नाटकाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाल्यांपासून पालकांपर्यंत सर्वांनाच खुर्चीला खिळवून ठेवणारे हे नाटक मजा, मस्ती, धमाल करत सगळे एन्जॉय करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -