Monday, July 15, 2024
HomeदेशElection Results: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू, पाहा कोणाचे बनणार...

Election Results: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू, पाहा कोणाचे बनणार सरकार

नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार. कोणाच्या माथ्यावर सत्तेचा ताज येणार आणि कोणाच्या झोळीत पराभव पडणार याचा निर्णय आज होणार आहे. या चार राज्यांमध्ये मतमोजणी(counting) सुरू झाली आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये यादरम्यान जोरदार टक्कर दिसत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर दिसत आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळू शकतो.

पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने या पाच राज्यांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. मिझोरम निवडणुकीची मतमोजणी सोमवारी ४ डिसेंबरला होणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. येथे बहुमतासाठी ११६ जागा मिळणे गरजेचे आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा ४६ जागांसाठी आहे. राजस्थानात विधानसभेच्या २०० जागा आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी येथे १०१ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा आहेत येथे बहुमताचा आकडा ११० आहे. मिझोरममध्ये विधानसभेच्या ४० जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा २१ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -