Sunday, July 7, 2024
HomeदेशAssembly election: जनता-जर्नादनाला नमन, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकीवर पंतप्रधान...

Assembly election: जनता-जर्नादनाला नमन, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकीवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: राजस्थान(rajasthan), मध्य प्रदेश(madhya pradesh), राजस्थान(rajasthan) आणि तेलंगणा(telangana) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की जनता-जनार्दनाला नमन!. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले की भारताच्या जनतेचा विश्वास केवळ आणि केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणात आहे. त्यांचा विश्वास भाजपवर आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपवर आपला स्नेह, विश्वास आणि आशीर्वाद बरसण्यासाठी या सर्व राज्यांच्या कुटुंबियांचे खासकरून माता-भगिनी-मुलींचे, आमच्या तरूण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना विश्वास देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी निरंतर अथक परिश्रम करत राहू.

या निमित्ताने पक्षाच्या सर्व परिश्रमी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी अद्भुत उदाहरण सादर केले आहे. भाजपचा विकास आणि गरीब कल्याणकारी योजना ज्या पद्धतीने लोकांमध्ये पोहोचवल्या त्याचे कौतुक जितके केले जावे कमी. आम्ही विकसित भारताचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाहीये. तसेच थकायचेही नाही. आम्हाला भारताला विजयी बनवायचे आहे. आज या दिशेने आम्ही पुन्हा एकदा सशक्त पाऊल उचलले आहे.

 

तेलंगणाबाबत काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान मोदी म्हणाले, तेलंगणामधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो भाजपला समर्थन देण्यासाीठी धन्यवाद. गेल्या काही वर्षांपासून हे समर्थन वाढत आहे. येणाऱ्या काळातही हेच चालू राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे. आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो.

कोणला किती मिळाल्या जागा?

संध्याकाळी चार वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील २३० जागांपैकी भाजप १० जागांवर विजयी तर १५६ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने आतापर्यंत तीन जागा जिंकल्यात आणि ६० जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहे.

राजस्थानात भाजपने ५३ जागा जिंकल्या आहेत तर ६२ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने आतापर्यंत २७ जागा जिंकल्या आहे आणि ते ४२ जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानात १९९ जागा आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -