Sunday, January 19, 2025
HomeदेशAssembly election: छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपला मोठे यश, काँग्रेसचा पराभव

Assembly election: छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपला मोठे यश, काँग्रेसचा पराभव

नवी दिल्ली: मध्य प्रदेश(madhya pradesh), छत्तीसगढ(chattisgarh), तेलंगणा(telangana) आणि राजस्थान(rajasthan) येथील विधानसभा निवडणुकीची(assembly election) मतमोजणी सुरू आहे.विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपने(bjp) चांगले प्रदर्शन केले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये तर काँग्रेसला मागे टाकत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.

छत्तीसगडमध्येही काँग्रेसला भाजप मोठी टक्कर देत आहे. तेलंगणामध्ये २०१८च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. मात्र या निवडणुकीत भाजपने प्रगती केली आहे. अशातच भाजपमध्ये जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी ५ वाजता भाजपच्या मुख्यालयात जल्लोष साजरा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ६.३० वाजता भाजपच्या मुख्यालयात पोहोचतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

छत्तीसगडमध्ये मोठ्या उलटफेराचे संकेत

छत्तीसगडमध्ये यंदाच्या मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. येथे काँग्रेसला पिछाडून भाजप आघाडी घेताना दिसत आहे. जेव्हा मतमोजणी सुरू होती तेव्हा काँग्रेस पुढे होते मात्र नंतर भाजपने वेग पकडला आणि काँग्रेसच्या पुढे गेले.

भाजपची चांगली कामगिरी

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार हिंदी भाषिक तीन राज्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३०, राजस्थान १९९, तेलंगणामध्ये ११९ आणि छत्तीसगडमध्ये ९० जागांवर निवडणुक पार पडल्या होत्या. या चार राज्यांपैकी दोन राज्ये छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे तर मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे.

अनेक राज्यांमध्ये जल्लोष

भाजपमध्ये जसजशी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठी आघाडी मिळत आहे तसतसे पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजप कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यास सुरूवातही केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -