Tuesday, June 17, 2025

Animal Box Office Collection: शाहरूख-सनीच्या पुढे गेला रणबीर, २ दिवसांत छापले इतके कोटी

Animal Box Office Collection: शाहरूख-सनीच्या पुढे गेला रणबीर, २ दिवसांत छापले इतके कोटी

मुंबई: रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डीमरी स्टारर अॅनिमल(animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर(box office) रिलीज झाला आहे. या सिनेमात शक्ती कपूरही आहे. टीझर आणि ट्रेलर रिलीज आल्यानंतर प्रेक्षक अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेरीस चाहत्यांची प्रतीक्षा संपली आणि १ डिसेंबरला सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला.


हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. सिनेमात दक्षिणेचा दिग्गज सिनेनिर्माता संदीप रेड्डी वांगाने दिग्दर्शित केला आहे. रश्मिका आणि दिग्दर्शकामुळे या सिनेमाची क्रेझ दक्षिणेतही पाहायला मिळत आहे.


अॅनिमल रिलीजसोबत सोशल मीडियावर ट्रेंड बनला आहे. चाहते सिनेमाशी संबंधित सीन्स आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करत आहेत. चाहत्यांची हे क्रेझ पाहून तुम्ही अनुमान लावू शकता की निर्माते धुंवाधार कमाई करत आहेत.


या सिनेमाने पहिल्याच दिवशी ६३.८ कोटी रूपयांचे कलेक्शन केले आहे. हिंदीत सिनेमाने ५४.७५ कोटी, तेलुगुमध्ये ८.५५ कोटी रूपये, तामिळमध्ये ४० लाख आणि मल्याळमध्ये केवळ १ लाख रूपये कमावले आहेत.



दोन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन


अॅनिमलने दुसऱ्या दिवशी ६६ कोटी रूपयांचे कलेक्शन केले आहे. या सिनेमाने दोन दिवसांत १२९.८० कोटी रूपयांचे कलेक्शन केले आहे.



जवान आणि गदर २च्या पुढे निघाला रणबीर कपूर


शाहरूख खानच्या जवानने ओपनिंग डेला ८९ कोटींचे कलेक्शन केले होते. तर दुसऱ्या दिवशी जवानने ६३ कोटींची कमाई केली होती. सनी देओलने ओपनिंग डेला ४० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ४३.०८ कोटींची कमाई केली होती. अॅनिमलच्या दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन जवान आणि गदर २ पेक्षाही जास्त आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा