Friday, July 11, 2025

ब्रँडेडच्या नावे मुंबईत बनावट घड्याळांची विक्री!

ब्रँडेडच्या नावे मुंबईत बनावट घड्याळांची विक्री!

९ दुकानांवर पोलिसांचे छापे; ६ कोटींची १,५३७ बनावट घड्याळे जप्त


मुंबई : राडो, टिसॉट, ओमेगा, ऑडेमार्स पिगेट, ह्यू बॉस (Rado, Tissot, Omega, Audemars Piguet, Huw Boss) या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाखाली बनावट घड्याळे (Fake Branded Watch) विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केला आहे. संबंधीत कंपन्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


मुंबई पोलिसांनी मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील एटी मार्केटमधील ९ दुकानांवर धाड टाकून प्रसिद्ध ब्रँडची तब्बल ६ कोटी रुपयांची १ हजार ५३७ बनावट घड्याळे जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे.


या प्रकरणी घेवाराम अण्णाराम चौधरी, भावेशकुमार औखाजी प्रजापती , गणेश नारायण भारती आणि मोहम्मद शोएब अब्दुल गनी कुरेशी या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँडेड घड्याळे अनधिकृतरित्या बनबून ती बाजारात विक्री केली जात होती. याबाबत संबंधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून मुंबई गु्न्हे शाखा युनिट २ ने मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील ९ दुकानांपर छापे टाकले.


आरोपींविरुद्ध फसवणूक आणि कॉपीराइट कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बनावट घड्याळे बनवण्यात अजून कोणी सामिल आहे का, याचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >