Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सJayesh Pandagale : ‘मस्त मौला’ जयेश

Jayesh Pandagale : ‘मस्त मौला’ जयेश

जयेश भारती राम पंडागळे हा मनोरंजन क्षेत्रातील उगवता तारा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या अभिनयाचा प्रकाश मनोरंजनाच्या क्षितिजावर पसरवत चालला आहे. त्याचे शालेय शिक्षण कांदिवलीच्या सेंट लॉरेन्स शाळेत झाले. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग असायचा. एकदा शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे वडील मा. आमदार राम पंडागळे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यासमोर भाषण करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

मिठीबाई महाविद्यालयातून त्याने पुढील क्षिक्षण घेतले. तेथील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. किशोर नमित कपूरकडून त्याने अभिनयाचे धडे गिरविले. स्टँडअप कॉमेडी किंग नवीन प्रभाकर त्याचा जीवाभावाचा मित्र आहे. निर्मितीची आवड असल्याने त्याने वडिलांच्या मदतीने अष्टविनायक प्रॉडक्शनची निर्मिती केली. त्यानंतर त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. ‘वन लाईफ’ ही शॉर्ट फिल्म बनवली. पुणे फेस्टिव्हलमध्ये ती दाखवली गेली. त्यानंतर ‘माफिया तडका’ ही दुसरी शॉर्ट फिल्म बनवली गेली. त्यामध्ये डॉनची भूमिका त्याने साकारली होती.

फिरोज शेख (विकी) या नृत्य कोरिओग्राफर व दिग्दर्शकांच्या प्रोत्साहनामुळे पुढे ‘हर लम्हा’ या म्युझिक अल्बममध्ये त्याने रोमँटिक नायकाची भूमिका साकारली. या अल्बममधील गाणी रसिकांच्या ओठावर रुळली. या म्युझिक अल्बम रिलीजनंतर जवळपास साडेपाच लाख रसिकांनी त्याला पसंतीची पावती दिली. त्यावेळी त्याला सारखा फोन चार्जिंग करावा लागायचा. दररोज रसिकांच्या प्रतिक्रिया फोनवरून ऐकून त्याचा कान गरम झाला होता. “तू किती लहान होतास, आता तू फार मोठा झाला आहेस” अशी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी दिल्या. ग्लॅमरच्या दुनियेत त्याला एक ओळख मिळाली. त्याचे वडील ‘जयेशचे वडील’ म्हणून ओळखले जाऊ लागले; परंतु त्याच्या मनात आई-वडिलांच्या कृतार्थपणाची भावना आजदेखील जपून आहे. “मी कितीही मोठा झालो तरी आई-वडिलांच्या पंखाखाली राहणार. त्यांचाच मुलगा म्हणून कायमस्वरूपी राहणार”, असे त्याचे मत आहे. त्यानंतर त्याचा ‘मस्त मौला’ हा नवीन म्युझिक अल्बम आलेला आहे. ‘तू है शोला तो मैं हू मस्त मौला’ असे म्हणत त्याने धुमाकूळ घातलेला आहे व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू पाहत आहे. गाणी ऐकणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या गाड्या चालविणे त्याला आवडते. लवकरच रूपेरी पडद्यावर त्याचे आगमन होणार आहे. त्याच्या भविष्यकालीन रूपेरी कारकिर्दीला हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -