Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरवाडा तालुक्यातील गृहिणी जान्हवी कराळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

वाडा तालुक्यातील गृहिणी जान्हवी कराळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

वाडा : वाडा तालुक्यातील वसुरी (बु.) येथील रावाचापाडा येथील जान्हवी जितेंद्र यांना मानवविज्ञान शाखेअंतर्गत मराठी या विषयातील “मराठी भाषेतील अनुवादित कथासाहित्यांचा अभ्यास” (इ.स.२००० नंतरच्या कथा) या संशोधन प्रबंधासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले, विद्यापीठातर्फे विद्यावाचस्पती “Doctor of Philosophy” (Ph.D.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांना मिळालेला यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण पी. जे. हायस्कूल येथे झाले. त्यानंतर एम. ए. शिक्षण प्रथम श्रेणीत पास होऊन एल. एल. बी शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी कुटूंब, मुलांचे शिक्षण, प्रपंच सांभाळुन शिक्षणाचा वारसा कायम सुरू ठेवलेला आहे. त्यांचे पती स्वतः प्रोफेशन मध्ये असून अडव्होकेट अँड टॅक्स प्रॅक्टीशनर आहेत. त्यांच्या प्रोफेशनल कामामध्ये देखील त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. आपल्या समाजामध्ये लग्न होऊन शिक्षणाचा वसा जपणारे दुर्मिळ उदाहरण आपणास पाहावयास मिळत आहे. आपल्या ग्रामीण भागातील समाजामध्ये त्यांचे शिक्षणाविषयी प्रेम कौतुकास्पद आहे.

त्यांचे मूळ गाव पालसई हे असून त्यांच्या वडिलांचे नाव कै. डॉ. मधुकर जानु पाटील हे देखील सामाजिक सेवेत तत्पर होते. आई साधना मधुकर पाटील या पी. जे. हायस्कूल वाडा येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुळात शैक्षणिक वारसा जपणारे हे कुटूंब आहे. त्यांचे सासर हे कराळे परिवार रावाचापाडा येथील आहे. त्यांच्या शैक्षणिक यशामध्ये त्यांचे पती, त्यांचे कुटूंब, सहकारी आणि त्यांचे मार्गदर्शक प्रो. डॉ. किरण नामदेव पिंगळे व के. टी. एच. एम. महाविद्यालय, मराठी विभाग, नाशिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -