Monday, August 4, 2025

VIDEO: PM मोदींच्या स्वागतासाठी दुबईत उसळली मोठी गर्दी

VIDEO: PM मोदींच्या स्वागतासाठी दुबईत उसळली मोठी गर्दी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिटमध्ये ‘COP-28’ मध्ये सहभागी होत आहेत. गुरूवारी या परिषदेत भाग घेण्यासाठी ते दुबईत पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी उसळली होती. पंतप्रधान मोदींच्या स्वागतादरम्यान भारतीय लोकांनी सारे जहाँ से अच्छा हे गाणे म्हटले. तसेच भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.


पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले की ‘COP-28 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दुबई पोहोचलो आहे. शिखर परिषदेच्या कार्यवाहीची प्रतीक्षा करत आहे ज्याचा उद्देश एक चांगला ग्रह बनवणे हा आहे.


 




दुबई रवाना होण्याआधी मोदी म्हणाले की जेव्हा क्लायमेट अॅक्शनची वेळ येते तेव्हा भारताने जे म्हटले आहे ते करून दाखवले आहे. जी-२०च्या आमच्या अध्यक्षतेदरम्यान क्लायमेट ही आमची प्राथमिकता होती. पंतप्रधान तीन इतर वरच्या स्तरावरील कार्यक्रमात भाग घेतील. भारताला क्लायमेट फंडिंगबाबत सहमती बनण्याची आशा आहे.


मोदी जलवायूवर आधारित संयुक्त राष्ट्रच्या कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीजदरम्यान शुक्रवारी विश्व जलवायू कार्यवाही शिखर परिषदेत भाग घेतील. याला सीओपी २८ असे नाव आहे. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जलवायू परिवर्तनाशी लढण्यासाठीच्या पद्धतींवर चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक नेते जलवायू कार्यवाही शिखर परिषदेत भाग घेणार आहेत.

Comments
Add Comment