Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीLPG Cylinder price hike : वर्षाच्या अखेरीस गॅस सिलेंडर महागला!

LPG Cylinder price hike : वर्षाच्या अखेरीस गॅस सिलेंडर महागला!

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत मात्र बदल नाही

मुंबई : वर्षाचा शेवटचा महिना सुरू होताच महागाईचा (Inflation) आणखी एक मोठा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमती अपडेट होत असतात. यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial gas cylinder) दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आधीपासूनच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. तर घररगुती सिलेंडरच्या (Domestic gas cylinder) किंमतीत बदल झालेला नाही.

दिवाळीपूर्वी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत १०३ रुपयांनी वाढ केली होती आणि १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीत त्याची किंमत १८३३.०० रुपये झाली होती. मात्र १६ नोव्हेंबरला छठ पुजेच्या निमित्ताने एलपीजी सिलेंडरवर दिलासा देण्यात आला होता. सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी कमी करत १७५५.०० रुपये झाली होती. मात्र वर्षाच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर ४१ रुपयांनी वाढवले आहेत.

अद्ययावत किमतींनुसार, राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता १७९६.५० रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १७२८.०० रुपयांवरुन १७४९.०० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये त्याची किंमत १८८५.५० रुपयांवरून १९०८.०० रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरसाठी १९४२.०० रुपयांऐवजी १९६८.५० रुपये मोजावे लागतील.

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत बदल नाहीDomestic gas cylinder

एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी १४ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. IOCL (Indian Oil Corporation Ltd.) च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आल्यानुसार, कोलकात्यात घरगुती सिलेंडर ९२९ रुपयांना, मुंबईत ९०२.५० रुपयांना आणि चेन्नईत ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -