रायपूर: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चार सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवत ही मालिका खिशात घातली आहे.
भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला मालिकेत पराभव करत घेतला. भारताने चौथ्या सामन्यात ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ बाद १५४ धावा करता आल्या.
भारताकडून रिंकू सिंहने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर जितेश शर्माने त्याला चांगली साथ देत ३५ धावांची खेळी केली. भारताची सुरूवात चांगली झाली. भारताच्या सलामीवीरांनी जयश्वी जायसवालने ३७ धावा तर ऋतुराज गायकवाडने ३२ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचे काही विकेट झटपट पडले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला या सामन्यात केवळ एक धाव करता आली.
१७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघाची सुरूवात डळमळीत झाली. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून ट्रेविस हेडने ३१ धावा केल्या तर मॅथ्यू वेडने नाबाद ३६ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.