मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेता चौथा सामना आज रायपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. कारण भारताने आजचा सामना जिंकला तर मालिकेवर त्यांचा कब्जा राहील. मात्र आज जर भारताला विजय मिळवता आला नाही तर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना निर्णायक राहील.
फलंदाजीत एक बदल होण्याची शक्यता
आजच्या सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या प्लेईंग ११मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यरची एंट्री होऊ शकते. तो चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव श्रेयसला आपल्या संघात सामील करू शकतो. अय्यरला तिलक वर्माच्या जागी स्थान मिळू शकते. कारण तिलक वर्माला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही.
गोलंदाजीत मुकेश परतणार
याशिवाय टीम इंडियाच्या गोलंदाजीतही बदल केले जाऊ शकतात. पहिल्या दोन टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज तिसरा टी-२० सामना खेळू शकला नव्हता. कारण त्याने आपल्या लग्नासाठी बीसीसीआयकडून सुट्टी मागितली होती. तिसऱ्या सामन्यात त्याच्या जागी आवेश खानला संधी मिळाली होती. त्याने चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा खूप महागडा ठरला होता. यामुळे चौथ्या सामन्यात त्याच्या ऐवजी मुकेश कुमारला संधी मिळू शकते.
टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग ११ - यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव(कर्णधार),रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार.






