Sunday, April 20, 2025
Homeमनोरंजनअपारशक्ती खुराणाचं नवीन 'तेरा नाम सुनके' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अपारशक्ती खुराणाचं नवीन ‘तेरा नाम सुनके’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अपारशक्ती खुराणा हा एक उत्तम अभिनेता तर आहे सोबतीने तो एक उत्तम संगीतकार गायक देखील आहे. संगीत कौशल्य दाखवून त्याने अभिनयाच्या सोबतीने आपली ही बाजू देखिल पक्की केली आहे. नुकतेच त्याचं ‘तेरा नाम सुनके’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

यापूर्वी ‘कुडिये नी’ या गाण्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि गाणं सुपरहिट ठरलं. २५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवून हे गाणं आजही तितकच ट्रेंड मध्ये आहे. अपारशक्तीचे ‘तेरा नाम सुनके’ हे गाणं एक हृदयस्पर्शी संगीतमय कथा भावपूर्ण गीत यांचं अनोखं मिश्रण आहे. निर्मान यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गाणं अभिनेत्री निकिता दत्ता हिच्या सोबत शूट करण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hitz Music (@hitz.music.official)

आपल्या नवीन गाण्याबद्दल बोलताना अपारशक्ती म्हणतो “मला वाटते की मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करतोच आहे आणि अजून नवनवीन काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. ज्युबिलीसाठी बॅक टू बॅक पुरस्कार जिंकणे बर्लिनच्या सर्व फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक मिळणे, होस्टिंग, गाणी या सगळ्या गोष्टी मला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. माझ्या म्युझिक प्रोजेक्ट् सिंगल “कुडिये नी” ला इंस्टाग्राम आणि स्पॉटिफाईवर खूप प्रेम मिळाल्यानंतर आता हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. मी लिहिलेलं संगीतबद्ध केलेली ही गाणी प्रेक्षकांना मोहित करून जातील यात शंका नाही.”

‘तेरा नाम सुनके’ चाहत्यांना आणि संगीत रसिकांना अपारशक्ती खुराणा यांच्या संगीत प्रवासाची अनोखी झलक दाखवणार तर आहेच आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविलेल्या ‘बर्लिन’ या चित्रपटाच्या यशानंतर अपारशक्ती उंच भरारी घेत राहणार आहे. बर्लिन व्यतिरिक्त अपारशक्ती पुढे बहुप्रतीक्षित “स्त्री २” मध्ये दिसणार आहे आणि अॅप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित “फाइंडिंग राम” या आकर्षक माहितीपटात तो झळकणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -