Tuesday, July 1, 2025

South Africa Tour : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित आणि विराटला आराम

South Africa Tour : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित आणि विराटला आराम

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(bcci) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील(south africa tour) तीनही फॉरमॅटच्या मालिकेसाठी भारतीय संघाची(team india announce) घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला व्हाईट बॉल लेगसाठी आराम देण्यात आला आहे. अशातच सूर्यकुमार यादव टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे तर वनडे संघाचे नेतृ्त्व केएल राहुल करणार आहे. दरम्यान, कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे.


कसोटी संघातून अनेक दिग्गज खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेचे नाव सामील आहे. यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. कसोटी संघात ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांना स्थान देण्यात आले आहे.


टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. ३ सामनयांच्या टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका आणि कसोटी मालिका रंगणार आहे. पुढील वर्षी जानेवारीपर्यंत हा दौरा सुरू राहील. वनडे संघात साई सुदर्शनला स्थान मिळाले आहे तर संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. सूर्यकुमार यादवला वनडे आणि कसोटी संघातून बाहेर करण्यात आले आहे.


वनडे संघात रजत पाटीदार आणि रिंकूच्या नावाचाही समावेश आहे. तिलक वर्मा मध्यम फळीतील फलंदाजांमध्ये आपले स्थान बनवण्यात यश मिळाले आहे.



३ टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ -


यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन(विकेटकीपर), जितेश शर्मा, रवींद्र जडेजा(उप कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.



३ वनडेसाठी भारतीय संघ -


ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल(विकेटकीपर), संजू सॅमसन(विकेटकीपर), अक्षऱ पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि दीपक चाहर.



२ कसोटीसाठी भारतीय संघ -


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, केएल राहुल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.

Comments
Add Comment