आमदार नितेश राणे यांनी लगावली सणसणीत चपराक
मुंबई : संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) आज सकाळी हे नामर्दांचं सरकार आहे, अशी आमच्या सरकारवर टीका केली. पण मर्दानगीची प्रमाणपत्रं कोण देतंय? जो डॉक्टर स्वप्ना पाटकरच्या घरावर वारंवार हल्ले करतोय, दगड, दारुच्या बाटल्या मारतोय आणि नामर्दासारखं तिला पाठवलेल्या धमकीच्या पत्रावर स्वतःचं नाव पण लिहित नाही, तो दुसऱ्यांना नामर्द बोलतोय, अशा तिखट शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांना त्यांच्याच भाषेत सणसणीत चपराक लगावली.
नितेश राणे म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंना अपशब्द वापरला तर मग अब्दुल सत्तारांना वेगळा न्याय का? असं विचारतोस मग तू त्या डॉक्टर महिलेविरोधात काय काय अपशब्द वापरलेस, किती शिव्या घातल्यास, त्या गोष्टी चालतात का? त्या तुझ्या मर्दानगीच्या चौकटीत बसतात का? ११ डिसेंबर २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एक घटना मुंबईत घडली. तिथे राऊतच्याच लोकांनी एका महिलेच्या गाडीवर फायरिंग केली. मग संजय राऊतने सांगावं की त्याचं त्या घटनेशी काही देणंघेणं नाही.
राजाराम राऊतच्या दोन्ही मुलांनीच ईशान्य मुंबईत शिवसेना संपवली
पुढे नितेश राणे म्हणाले, संजय राऊतला कालपासून माजी महापौर दत्ता दळवींवर (Datta Dalvi) फार प्रेम येतंय. याच दत्ता दळवींनी स्वतः मला काही महिन्यांअगोदर माझ्या जुहूच्या घरी भेटून सांगितलं होतं की, याच राजाराम राऊतच्या दोन्ही मुलांमुळे ईशान्य मुंबईमध्ये शिवसेना संपत चालली आहे. शिवसेनेतून असंख्य लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत, आणि याच दत्ता दळवीजींनी राजाराम राऊतांच्या दोन नालायक, कपाळकरंट्या मुलांमुळे भाजपमध्ये येण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.
पण दोन दिवसांपासून राऊतांचं दळवींवर फार प्रेम उफाळून आलं आहे. तेच जेव्हा तुमच्या पक्षात होते तेव्हा त्यांना त्रास का दिला? कालही तुम्ही त्यांची गाडी फोडली. त्याचं म्हणणं होतं की गाडी फोडणाऱ्यांनी तिथे उभं राहावं, पण कसं उभं राहणार. कारण त्यांना तशा सूचनाच दिल्या नव्हत्या. गाडी फोडणारे या राऊत बंधूंचे लोक होते, असा मला सरळ संशय आहे. दत्ता दळवींवर जो पहिल्यापासून राग होता, तो काढण्यासाठी हे सर्व प्रकार सुरु आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
गाडी फोडून पळून जाणारा हा कधीच बाळासाहेबांचा शिवसैनिक नाही. पण आतापर्यंत राऊतांकडून नौटंकी करुन पळून जाण्याचेच प्रकार सुरु आहेत. मग ते स्वप्ना पाटकरच्या घरावरील हल्ला असो किंवा कोणाच्या गाडीवर फायरिंग असेल आणि आता काही महिन्यांपूर्वी स्वतःच्याच उमेश शिंदे नावाच्या कार्यकर्त्याला धमकी द्यायला लावून स्वतःचं संरक्षण वाढवून घेतलं. ही सगळी नौटंकी राजाराम राऊताच्या दोन कार्ट्यांचीच आहे, असं नितेश राणे म्हणाले.
View this post on Instagram
ईशान्य मुंबईत उभं राहायला घाबरता कशाला?
संजय राऊत मोठेपणाने म्हणतो की ईशान्य मुंबईत चक्काजाम करुन टाकणार. पण तुझ्या घरचे तुला ते करु देणार नाहीत. तुझ्या घराबाहेर आधी चक्काजाम करुन दाखव आणि मग ईशान्य मुंबईची बात कर. पुढे राऊत बंधूंना उद्देशून नितेश राणे म्हणाले, तुझ्यात हिंमत असेल तर संजय राऊतला ईशान्य मुंबईत उभं राहायला सांग, का पळ काढला तिथून? का संजय पाटीलचा राजकीय बळी द्यायला चालला आहात? कारण यांच्या घरचे यांना मतदान करणार नाही अशी अवस्था आहे. म्हणून जी नौटंकी, भंपकपणा सुरु आहे, त्याला काही अर्थ नाही. नामर्द कोण आहे हे जर कधी बघायचं असेल तर संजय राऊतला बघा. नामर्द कोण असतो, कसा दिसतो, कसा जॅकेट घालून बसतो याचं उत्तम उदाहरण दिसेल, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे कोविडमध्ये खरंच आजारी होते का?
जो स्वतः मुल्ला झाला आहे, ज्याचं धर्मांतर झालं आहे त्याला लोक सुलतानच वाटणार. त्याला दाढी कुरवाळणाऱ्यांशिवाय दुसरी नावं येणारच नाहीत. असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. पुढे संजय राऊतांना उद्देशून ते म्हणाले, आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले म्हणून एवढ्या मिरच्या झोंबतायत? पण महाराष्ट्रामध्ये कोविडमुळे जेव्हा बळी जात होते तेव्हा तुझा मालक गळ्याला पट्टा बांधून घरी बसून नाटक करत होता. तो खरंच आजारी होता का, की नाटक होतं? हे बाहेर काढण्याची वेळ आली आहे, असं नितेश राणे म्हणाले.
…तर प्रकाश आंबेडकर टिपू सुलतानच्या अवतीभवती देखील जाणार नाहीत
प्रकाश आंबेडकर यांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला या कृतीवर नितेश राणे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इस्लाम धर्मीयांबद्दलचं मत आणि विचार वाचावेत असा मी त्यांना सल्ला देईन. त्यांच्याकडे नसेल तर मी पुस्तक पाठवतो, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून इस्लाम’. ते वाचल्यानंतर टिपू सुलतानच्या अवतीभवती देखील जाण्याची हिंमत प्रकाशजी करणार नाहीत, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेची खाट टाकण्यासाठी राऊत बसला आहे
अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, तसंही ३१ डिसेंबरनंतर जागा खाली होणार आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर चोख प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊताची उद्धव ठाकरे सोडून बाकी सगळ्यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. कारण त्याचीच खाट टाकण्यासाठी राऊत तिथे बसला आहे. अशा ३१ डिसेंबरसारख्या तारखा खूप ऐकल्या आहेत. पण ३१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ची सकाळ संजय राऊत आणि आदित्य ठाकरे त्यांच्या घरात बघणार नाहीत. दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या केसमध्ये त्यांना सकाळी आर्थर रोड जेलमधून हॅपी न्यू इयर करावं लागेल, असं नितेश राणे म्हणाले.