Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीMobile: मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Mobile: मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

मुंबई: लोकांच्या मनात मोबाईल फोनच्या(mobile phone) बॅटरीबाबत(battery) अनेक प्रश्न येत असतात. जसे मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला(charging) लावून ठेवणे योग्य आहे का? असे केल्याने फोन खराब होऊ शकतो का? सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य आहे की अयोग्य? अशा प्रश्नांची यादी तुमच्याकडेही असेल. तसेच मोबाईल किती टक्के चार्ज करणे गरजेचे असते. तसेच चार्ज करण्याची योग्य वेळ कधी असते या अनेक प्रश्नांवर आज तुम्हाला या लेखातून उत्तरे मिळणार आहेत.

लोकांना फोनची बॅटरी आणि त्याच्या चार्जिंगबाबत खूप चिंता असते. कारण याआधी अनेकदा मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बरेचजण याबाबत सतर्क आहेत. दरम्यान, जोपर्यंत डिव्हाईसमध्ये कोणतेही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नसेल अथवा कोणताही एक्सटर्नल प्रॉब्लेम नसेल तर डिव्हाईसमध्ये आग लागत नाही.

रात्रभर फोन चार्ज केल्याने बॅटरी ओव्हरलोड होते का?

तज्ञांच्या मते आजकाल नवे स्मार्टफोन खूपच स्मार्ट असतात ते ओव्हरलोडची समस्या येऊ देत नाहीत. फोनमधील एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह चिप्स सुनिश्चित करतात की टॅबलेट, फोन अथवा लॅपटॉप ओव्हरलोड होणार नाही. जसेही इंटरनल लिथियम आर्यन बॅचरी आपल्या कॅपॅसिटीच्या १०० टक्क्यांपर्यंत पोहोचते बॅटरीचे चार्जिंग बंद होते. मात्र जर तुम्ही रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवाल तर मोबाईल फोन काही प्रमाणात एनर्जी कंझ्युम करेल. जेव्हा फोनची बॅटरी ९९ टक्क्यांवर येते तेव्हा मोबाईल पुन्हा चार्ज होऊ लागतो. यामुळे फोनच्या आयुष्यमानावर परिणाम होतो.

काय करणे योग्य?

याबाबत चिंता करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा फोनला चार्जिंगला लावा आणि चार्जिंग झाल्यानंतर काढून टाका अथवा रात्रीत जर तुमची झोप उघडली तर फोन चार्जिंगवरून काढा. यासाठी तुम्ही स्मार्ट प्लगचा वापर करू शकता ज्यामुळे काही वेळाने चार्जिंग बंद होऊन जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -