IND vs SA : १० डिसेंबरपासून सुरू होतोय भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, एका CLICK वर जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) आता दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यावर(south africa tour) जात आहे. आफ्रिकेत टीम इंडिया तीन टी-२०, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरूवात १० डिसेंबरला होईल. येथे जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक...


भारतीय क्रिकेट मंडळाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, आज घोषणा केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत त्या खेळाडूंना संधी मिळणार आहे ज्यांना विश्वचषक २०२४साठी निवडले जाऊ शकते.


भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत बोलायचे झाल्यास याची सुरूवात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. यानंतर तीन वनडे सामने खेळवले जातील आणि अखेरीस दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० मालिकेतील पहिल सामना १० डिसेंबरला खेळवला जाणार आहे.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना १० डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाईल. यानंतर दुसरा टी-२० सामना १२ डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क आणि तिसरा व शेवटचा टी-२० सामना १४ डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल. यानंतर १७ डिसेंबरपासून वनडे मालिकेची सुरूवात होईल. पहिला वनडे सामना जोहान्सबर्ग येथे तर दुसरा वनडे सामना १९ डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क आणि तिसरा व शेवटचा वनडे सामना २१ डिसेंबरला पार्लमध्ये खेळवला जाईल. यानंतर २६ डिसेंबरला पहिला बॉक्सिंड डे कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाईल. तर दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरूवात नव्या वर्षात ३ जानेवारीला होईल.



भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक


पहिला टी२० - १० डिसेंबर
दुसरा टी२० - १२ डिसेंबर
तिसरा टी२० - १४ डिसेंबर
पहिली वनडे - १७ डिसेंबर
दुसरी वनडे - १९ डिसेंबर
तिसरी वनडे - २१ डिसेंबर
पहिली कसोटी - २६-३० डिसेंबर
दुसरी कसोटी - ३-७ जानेवारी


Comments
Add Comment

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान