
- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यात एक मोरगाव भाकरे नावाचे एक ग्राम आहे. त्या ग्रामात मारुती पंत नावाचे एक पटवारी राहत असत. या मारुतीपंतांची महाराजांवर अत्यंत निष्ठा होती. या मारुती पंतांच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याकरिता तिमाजी नावाचा एक माळी रखवालदार ठेवला होता. हा तिमाजी रात्री खळ्यामध्ये झोपी गेला. त्याला गाढ निद्रा लागली.
रात्रीचे दोन प्रहर उलटून गेल्यावर कुंभराची १०-२० गाढवे खळ्यात शिरली आणि तेथील धान्य खाऊ लागली. राखणदारच झोपी गेला, त्यामुळे त्या गाढवांना कोण हाकलणार?
हे मारुती पंत महाराजांचे भक्त असल्यामुळे महाराजांना लीला करणे भाग पडले. महाराज क्षणार्धात शेगाव येथून मोरगाव येथे पोहोचले आणि त्यांनी तीमजीला जागे केले आणि महाराज अंतर्धान पावले. तिमाजी खडबडून जागा झाला. पाहतो तर धान्याची अर्धी अधिक रास गाढवांनी फस्त केली, असे त्याला दिसून आले. पण तीमजी हा निष्ठावान होता. हे सर्व चित्र पाहून त्यास वाईट वाटले. तो मनाशी विचार करू लागला की, “मालकाने मोठ्या विश्वासाने मला पिकाचे रक्षण करण्याकरिता ठेवले आहे. मी मात्र निजलो, त्यामुळे हा मालकाचा माझ्यामुळे एक प्रकारे विश्वासघातच झाला. आता मालक रागावेल. झाल्या प्रकाराबद्दल मालकाची समजूत कशा प्रकारे काढावी. अशा विचाराने तिमाजी हळहळला.
त्या वेळी लोकांना इमानाची किंमत होती. त्याने सर्वतोपरी विचार केला आणि मारुतीपंतांकडे येऊन त्याने सर्व वृत्तांत सांगून क्षमा प्रार्थना केली. तसेच खळ्यात येऊन पाहणी करावी, अशी विनंती केली. त्यावेळी मारुतीपंतांनी त्याला सांगितले की “सध्या मला वेळ नाही. मी शेगाव येथे महाराजांच्या दर्शनाकरिता जातो आहे. सकाळी आल्यावर धान्याचे काय झाले ते पाहीन.” असे सांगून मारुतीपंत शेगाव येथे येते झाले. सकाळी १०-११ वाजताच्या सुमारास दर्शनाकरिता मठात पोहोचले त्यावेळी महाराज आसनावर बसले होते. जगू पाटील त्यांचे समोर आणि बाळाभाऊ हात जोडून पाटलाजवळ बसले होते. मारुतीपंतांनी महाराजांचे दर्शन घेतले, त्यावेळी महाराजांनी स्मित हास्य करून मारुतीपंतांना म्हटले “तुझ्यासाठी रात्री मला त्रास झाला. तुम्ही माझे भक्त होता आणि मला राखण करावयास लावता, झोपाळू नोकर ठेवता आणि स्वतः खुशाल घरी निजता? मारुती, काल तिमाजी खळ्यात झोपला असताना खळ्यात गाढवांचा सुळसुळाट झाला. ते धान्याची रास भक्षण करू लागले. म्हणून मी खळ्यात जाऊन तिमाजीला जागे केले आणी निघून आलो.”
अशी खूण पटताच मारुतीने महाराजांसमोर हात जोडले आणि पायावर मस्तक ठेऊन म्हणाला :
आम्हा सर्वस्वी आधार।
आपुलाच आहे साचार।
लेकराचा अवघा भार।
मातेचिया शिरी असे॥८४॥
आमुचे म्हणून जें जें काही।
ते अवघेच आहे अपुले आई!।
सत्ता त्यावरी नाही।
तुम्हांवीण कवणाची॥८५॥
खळे आणि जोंधळा।
अवघाचि आहे आपला।
तिमाजी नोकर नावाला।
व्यवहार दृष्टी आहे की ॥८६॥
ब्रह्मांडाचे संरक्षण।
आपण करिता येथून।
लेकरांसाठी त्रासपूर्ण।
माता सोसी वारच्यावरी ॥८७॥
मी लेकरू आपुले।
म्हणूनीया आपण केले।
खळ्यात ते जाऊन भले।