
जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipur) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक महिला आणि दोन मुलांची गोळी झाडून हत्या(murder) करण्यात आली. शहराच्या झालाना परिसरात झालेल्या या हत्याकांडानंतर येथे मोठी खळबळ उडाली. हत्याच्या कारणांचा अद्याप खुलासा झालेला नाही. तिहेरी हत्येची सूचना मिळताच मोठ्या संख्याने पोलीस दल तेथे पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तेथे मोठ्या प्रमाणात पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना झालाना परिसरात बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास झाली. यात एका महिलेसह दोन मुलांना गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती आगीप्रमाणे संपूर्ण परिसरात पसरली. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली.
ही हत्या कोणी केली आणि का करण्यात आली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. घटनास्थळी अधिकारी पोहोचले असून याबाबतचा तपास जोरात सुरू आहे.
घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन मारली गोळी
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हल्लेखोर एकच असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्लेखोर झालाना परिसरातील सी-टू प्लाझा स्थित एका घरात घुसला. हा हल्लेखोर घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आणि खोलीत बसलेली महिला तसेच दोन मुलांना गोळी मारून हत्या केली. गोळी लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोराने मृत महिलेच्या नणंदेला धक्का देत तेथून फरार झाला. काही समजण्याच्या आत आरोपी तेथून फरार झाला होता.
लोक घरातून आले बाहेर
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोक घरातून बाहेर आले. या दरम्यान, घटना घडलेल्या परिसरातून रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने लोक तेथे पोहोचले. मात्र तेथे महिला आणि तिच्या दोन मलुांचा मृतदेह पडले होते. हे पाहून लोक चांगलेच भयभीत झाले आणि त्यांनी तात्काळ ही सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेतले.