Tuesday, April 29, 2025

विदेशताज्या घडामोडी

सतत अन्य महिलांकडे पहाणा-या प्रियकराचे डोळे प्रेयसीने फोडले!

सतत अन्य महिलांकडे पहाणा-या प्रियकराचे डोळे प्रेयसीने फोडले!

फ्लोरिडा : प्रेयसी सोबत असतानाही तिच्या समक्ष सतत अन्य महिलांकडे वखवखलेल्या नजरेने पहाणा-या प्रियकराला तिने अनेकदा समजावले. आठ वर्षांपासून डेटिंग करत असलेल्या या जोडप्यातील पुरुष इतर महिलांकडे पाहण्यावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत असे. परंतु तरीही तो ऐकत नसल्याने अखेर संतापलेल्या प्रेयसीने त्याचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सांगितले की, फ्लोरिडातील ही ४४ वर्षीय तरुणी नाराज होती की तिचा प्रियकर इतर महिलांकडे पाहत असे. घटनेच्या दिवशी त्या तरुणाने कुत्र्यांसाठी दोन रेबीज शॉट्स आणले होते. परंतु त्याच्या मैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तिने त्याच्या डोळ्यात सुईने हल्ला केला. पोलिसांनी सँड्रा जिमेनेझवर तिच्या प्रियकरावर रेबीजच्या सुईने हल्ला केल्याचा आरोप लावला आहे.

प्रियकराने पोलिसांना सांगितले की, जिमेनेझने दोन सुयांसह त्याच्यावर उडी मारली तेव्हा तो पलंगावर पडला होता. तिने उजव्या डोळ्यात सुई टोचली आणि तिने घटनास्थळावरून पळ काढला. प्रियकराने मदतीसाठी ९११ क्रमांकावर डायल केले. पोलिसांनी शोध घेतला असता काही तासानंतर, पोलिसांना ती एका निवासस्थानाबाहेर एका कारमध्ये झोपलेली आढळली.

दरम्यान, जिमेनेझने गुन्हा कबूल केलेला नाही आणि तीने दावा केला आहे की दुखापती त्याला दुसऱ्याच गोष्टीने झाल्या.

Comments
Add Comment