Sunday, June 22, 2025

मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला; इंदौर पुणे महामार्ग बंद

मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला; इंदौर पुणे महामार्ग बंद

मनमाड : मनमाड शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज आज पहाटे कोसळला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या पुलाचा मध्यभाग ढासळल्याने इंदौर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.


या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदौर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे.



या पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे मागेच स्ट्रक्चर ऑडिट झाले होते. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान या पुलाच्या पूर्वेकडील मोठा भाग कोसळला. यामुळे मातीचा असलेला मोठा भाग सुरक्षा कठड्यासहित कोसळला. यावेळी कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Comments
Add Comment