मुंबई: सरकारी बँक(government bank) कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. इंडियन बँक असोसिएशनने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ ते २० टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव चांगला आहे. यासोबतच ५ दिवस कामकाजाबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. फायनान्शियस एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार इंडियन बँक असोसिएशन आणि बँक युनियन यांच्यातील चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच या दोन्ही मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
IBA ने सांगितली ही बाब
फायनान्शियल एक्सप्रेसबाबत बोलताना आयबीएने सांगितले की पहिल्यांदा पगारवाढीबाबत चर्चा १५ टक्क्यांपासून सुरू झाली आहे. अशातच बैठकीत १५ ते २० टक्के पगारवाढीचा लाभ मिळू शकतो जे गेल्या अनेक वर्षांत चांगले आहे. पब्लिक सेक्टर बँका तसेच आयबीए यांच्यातील सध्याचा पगार करार १ नोव्हेंबर २०२२ला संपला आहे. ायानंतर सातत्याने पगारवाढीबाबत बँक युनियन्स तसेच आयबीए यांच्यात चर्चा सुरू आहे. जर पाच दिवसांचे कामकाज आणि पगार वाढीबाबतच्या मुद्द्यावर तोडगा निगाला तर हा नियम क्षेत्रीय ग्रामीण बँक कर्मचाऱ्यांनाही लागू होईल.
आठवड्याचे ५ दिवस कामाबाबत दीर्घकाळापासून मागणी प्रलंबित
बँक युनियन दीर्घकाळापासून पाच दिवसांचे कामकाजाचे नियम लागू करण्याची मागणी करत आहे. दरम्यान, बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. जर ५ दिवस कामकाजाबाबतची मागणी मान्य झाली तर आठवड्यातील पाच दिवस बँकेच्या कामकाजाच्या वेळेत ३० ते ४५ मिनिटांनी वाढ होईल. डिसेंबरच्या मध्यावधीत याबाबतचा निर्णय शक्य आहे.
लोकसभा निवडणुकीआधी मिळणार बक्षीस
पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणूक होत आहे. अशातच अर्थ मंत्रालय देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढीसह आठवड्यातील दोन दिवसांच्या सुट्टींचे बक्षीस मिळू शकते. आयबीए आणि बँक युनियम यांच्यात करार झाल्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे दिला जाईल. अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर नवे नियम लागू केले जातील.