
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या सिलक्याला बोगद्यातून अतिशय सुरक्षितपणे बाहेर आलेल्या सर्व मजुरांशी फोनवरून बातचीत केली. तसेच त्यांच्या आरोग्याचीही विचारपूस केली. यासोबतच त्यांचा आत्मविश्वासही वाढवला. याआधी त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बातचीत करून मजुरांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्यासाठी केलेल्या व्यवस्थांबाबतची माहिती घेतली.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली की बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर मजुरांच्या आरोग्याची देखभाल आणि त्यांना घरी सोडण्याबद्दल तसेच कुटुंबियांसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले की सर्व मजुरांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर सरळ चिन्यालीसौड स्थित रुग्णालयात नेले जाईल. येथे आवश्यक मेडिकल तपासणी केली जाईल.
तसेच या मजुरांच्या कुटुंबियांनाही सध्या चिन्यालीसौड नेले जाईल येथून त्यांच्या सुविधेनुसार राज्य सरकार त्यांना घरी सोडण्याची पूर्ण व्यवस्था करेल. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की पंतप्रधानांच्या मार्गदर्शनामुळे हे रेस्क्यू अभियान यशस्वी झाले. केंद्र सरकारच्या सर्व एजन्सी तसेच राज्य सरकार यांच्या समन्वयामुळे ४१ मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व लोकांना सलाम केला आहे.
त्यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले. त्यांची हुशारी तसेच शूरपणाचचे कौतुक करताना या श्रमिकांना जीवनदान मिळाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर लिहिले, उत्तरकाशीमध्ये आपल्या मजूर भावांचे रेस्क्यू ऑपरेशनचे यश हे भावूक करणार आहे. या बोगद्यात जे अडकले होते त्यांच्या साहसाची आणि धैर्याची कमाल आहे. ते नक्कीच प्रेरणादायक असेल.