Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीJioला टक्कर देण्यासाठी Airtelचा नवा प्लान, फ्रीमध्ये दिसणार नेटफ्लिक्स

Jioला टक्कर देण्यासाठी Airtelचा नवा प्लान, फ्रीमध्ये दिसणार नेटफ्लिक्स

मुंबई: एअरटेलने नुकसाच नवा प्लान लाँच केला आहे. यात युजर्सला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन फ्री मिळत आहे. या वर्षाच्या सुरूवातीला असाच प्लान जिओनेही लाँच केला आहे. आता एअरटेलने त्याला उत्तर देत हा नवा प्लान आणला आहे. सध्या भारतात जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्या आहे ज्या ५जी नेटवर्क देत आहे. दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर करत आहेत. अनेक बाबतीत या दोन्ही कंपन्यांचे प्लान एकसारखे आहेत.

एअरटेलच्या या प्लानबाबत बोलायचे झाल्यास हा नेटफ्लिक्स प्लान १४९९ रूपये किंमतीला आहे. या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगसह प्लानमध्ये ३जीबी ४जी डेटा दररोज मिळेल. तसेच काही ठिकाणी ५जी डेटाही मिळू शकतो. Airtel Prepaid Packageमध्ये नेटफ्लिक्सचा बेसिक प्लान सामील आहे जो एका वेळेस एकाच डिव्हाईसवर वापरला जाऊ शकतो.

जर तु्म्ही हा प्लान खरेदी केला तर लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट अथवा टीव्हीसह कोणत्याही डिव्हाईसवर वापरू शकता. नेटफ्लिक्सच्या प्लानअंतर्गत कंटेटला 720pमध्ये स्ट्रीम केले जाऊ शकते. जर तुम्ही हा प्लान खरेदी करला तर Airtel Hello Tunes चाही फ्री अॅक्सेस मिळू शकतो.

असा आहे जिओ प्लान

आता जिओ प्लानबाबत बोलायचे झाल्यास जिओचे सध्या दोन प्लान आहे. यात एक १,०९९ रूपयांचा आहे यात दररोज २ जीबी ५जी डेटा दिला जातो. तर १४९९च्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा वापरण्याची सोय आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह १०० एसएमएस दररोज मिळतात. या प्लान्समध्ये Netflix Subscription ही दिले जाते. जिओच्या या प्लान्सची व्हॅलिडिची ८४ दिवसांची आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -