Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीSolapur Crime : शिक्षक हैवान झाला; शिक्षिका पत्नीसह मुलाचा गळा घोटला!

Solapur Crime : शिक्षक हैवान झाला; शिक्षिका पत्नीसह मुलाचा गळा घोटला!

स्वतःही केली आत्महत्या; मात्र कारण गुलदस्त्यात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना (Solapur Crime) घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नी व मुलाची हत्या (Murder) करुन नंतर आत्महत्या (Suicide) केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली. अतुल मुंडे असे हत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून त्यांची पत्नीही शिक्षिकाच होती. हे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले असावे याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया पोलिसांकडून समोर आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंडे (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह राहत होते. त्यांच्या पत्नी तृप्ती अतुल मुंडे (वय ३५)देखील शिक्षका होत्या. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मात्र, आज अचानक मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला.

याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, अतुल मुंडे यांनी आधी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. हा संशय असून सर्वच बाजूंनी या घटनेचा तपास केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -