Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीSalt: रोज आपल्या डाएटमध्ये खा फक्त इतकं मीठ आणि बघा कमाल

Salt: रोज आपल्या डाएटमध्ये खा फक्त इतकं मीठ आणि बघा कमाल

मुंबई: मीठ हे आपल्या जीवनासाठी गरजेचे आहे. मात्र त्याचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास आपल्याला काही आजारांचा सामना करावा लागू शकोतो. मीठाचा सर्वाधिक परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. मीठामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आहे. सोडियम आपल्या शरीरात फ्लूड बॅलन्स करण्याचे काम करते. यामुळे मसल्स आणि नर्व्ह काम करतात.

जेव्हा शरीरात सोडियम कमी होते तेव्हा किडनी पाणी धरून ठेवते मात्र जेव्हा सोडियम जास्त असते तेव्हा किडनी मूत्राच्या स्वरूपात बाहेर काढते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त सोडियम झाल्यास किडनी हे अधिकच सोडियमचा निचरा करण्यास अयशस्वी ठरते. यामुळे सोडियम रक्तात जमा होऊ लागते आणि हे पाणी रोखण्यास सुरूवात करते.

यामुळे रक्ताचा व्हॉल्यूम वाढू लागतो आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. यामुळे आर्टरीमध्ये दाब निर्माण होऊन अनेक प्रकारचे हृदयाचे आजार तसेच किडनीचे आजार होतात. यासाठी नुकत्यात करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोजच्या जगण्यात तुम्ही जर दररोज एक चमचा मीठ कमी केल्यास हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना औषधे खाल्ल्याने जितका लाभ मिळत आहे त्यापेक्षा अधिक लाभ मिळेल.

मध्यम वयाचे लोक खातात जास्त मीठ

दररोज एक चमचा मीठ कमी खाल्ल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडतात. यामुळे हाय ब्लड प्रेशरचे औषध खाल्ल्याने जितका फायदा मिळतो तितका मिळतो तसेच अन्य आजारांची लक्षणेही कमी होतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहेच मात्र ज्यांना हा त्रास नाही आहे त्यांनाही हे फायदेशीर आहे.

किती मीठ आहे गरजेचे

जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका वयस्कर व्यक्तीने दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन केले पाहिजे. यात २ ग्रॅम सोडियम आणि ३.५ ग्रॅम पोटॅशियम असले पाहिजे. मात्र जगभरातील अधिकांश लोक ९ ते १२ टक्के मीठाचे सेवन करतात. आजकाल जितके प्रोसेस्ड फूड जसे पिझ्झा, बर्गरमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -