मुंबई : मुख्यमंत्र्यांबद्दल ‘नालायक’ असा शब्दप्रयोग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केल्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून त्याची सीडी राज्य सरकारने मागवली आहे. ती पाहून पुढील कारवाईसाठी कायदेशीर मतही घेतले जाणार असल्याचेही शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे नारायण राणे यांच्याप्रमाणे शिंदे सरकार आता उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकणार का, याची उत्सुकता आहे.
जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल नालायक असा शब्दप्रयोग केल्यानंतर आता शंभुराज देसाई म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरलाय. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत जे स्टेटमेंट आहे, त्याबाबत मी व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप मागवली आहे. ही सीडी कायदेतज्ञांकडून तपासू आणि पुढील निर्णय घेवू. ते मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काय केले होते हे सर्वांनी पाहिले होते. राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या मुख्यमंत्र्यांबाबत असा शब्दप्रयोग याआधी त्याच पदावर बसलेल्या व्यक्तीने करणे, ते ज्यावेळी मुख्यमंत्रिपदी होते, त्यावेळी त्यांच्याबाबत ज्यांनी वक्तव्य केलं होतं (नारायण राणे) त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली, तीच भूमिका आम्हाला घेणं शक्य आहे, आम्ही व्हिडीओ-ऑडिओ क्लिप बघून त्याबाबत जरुर विचार करु.”
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…