Thursday, June 19, 2025

Nitesh Rane : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आमदार नितेश राणे यांना शाब्बासकीची थाप

Nitesh Rane : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आमदार नितेश राणे यांना शाब्बासकीची थाप

तेलंगणा पेद्दापल्ली मधील उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत आमदार नितेश राणे


गृहमंत्री अमित शहा यांनी आमदार नितेश राणे यांच्या कामाची दखल घेत केले अभिनंदन..!


पेद्दापल्ली : तेलंगणा राज्यामधील पेद्दापल्ली विधानसभेचे उमेदवार श्री प्रदीप राव यांच्यासह पेद्दापल्ली जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या कामाची भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) यांनी दखल घेत अभिनंदन केले.


पेद्दापल्ली येथे कलेक्टर ऑफिस ग्राऊंडवर हेलिकॉप्टरने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन झाले तेव्हा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रचाराची जबाबदारी असलेल्या मतदार संघांची वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान प्रचार मोहिमेत आघाडी घेतल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचे त्यांनी अभिनंदन केले. आमदार नितेश राणे हे गेले काही दिवस तेलंगणा- पेद्दापल्ली येथे ठाण मांडून बसले आहेत.



प्रचारात सक्रिय सहभाग घेत भाजपच्या उमेदवारांसाठी विजयाच्या दिशेने ते आगेकूच करत आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक भाजपाचे नेते उपस्थित आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असून घराघरात कमळ निशाण चिन्ह पोहचवण्यात यश मिळवले आहे.

Comments
Add Comment