Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीInflation: पाकिस्तानात महागाईने हाहाकार, सोन्या-चांदीच्या दरात मिळतेय पीठ आणि साखर

Inflation: पाकिस्तानात महागाईने हाहाकार, सोन्या-चांदीच्या दरात मिळतेय पीठ आणि साखर

नवी दिल्ली: भारताचा शेजारील देश पाकिस्तानात(pakistan) यावेळेस महागाईने(inflation) उच्चांक गाठला आहे. तेथे भाज्यांपासून ते रेशनच्या धान्यापर्यंत सर्वांच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. काही गोष्टींचे दर इतके वाढलेले आहेत की ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

सगळ्यात आधी बोलूया पीठाबद्दल. पाकिस्तानात १५ किलो पीठाच्या पाकिटाची किंमत २३०० रूपये इतकी आहे. जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि महिन्याला तीस किलो अथवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे पीठ लागत असेल तर त्याची किंमत पाच हजाराहून अधिक होईल. भारतात इतक्या पैशात तर एक ग्रॅम सोने येईल.

पाकिस्तान असो वा भारत सकाळ ही चहानेच होते. दरम्यान, चहामध्ये विरघळणारी साखर पाकिस्तानच्या लोकांचे तोंड मात्र कडू करत आहे. येथे पाच किलो साखरेसाठी नागरिकांना तब्बल ७०० रूपये मोजावे लागत आहेत.

भात तर प्रत्येक घरात बनतोच. खासकरून पाकिस्तानातील लोकांना बिर्याणी खूप आवडते. मात्र पाकिस्तानात तांदळाचे दर इतके वाढलेले आहेत की सणासुदीच्या दिवसांतही बिर्याणी बनवण्याबाबत विचार कराल. येथे एक किलो बासमती तांदळाचा दर ४००हून अधिक आहे.

चहाच्या पत्तीशिवाय चहा बनणेच कठीण आहे. पाकिस्तानात ९०० ग्रॅम चहापत्तीची किंमत तब्बल १८०० रूपये आहे. भारतात तुम्हाला जो ब्रेड ३० ते ४० रूपयांना मिळतो पाकिस्तानात त्याचसाठी तब्बल १००हून अधिक रूपये मोजावे लागत आहे.

ब्रेडनंतर अंडींबाबत बोलायचे झाल्यास भारतात एक डझन अंडीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त ७० ते ८० रूपये द्यावे लागतात मात्र पाकिस्तानात एक डझन अंड्यांची किंमत ३९९ रूपयांहून अधिक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -