Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Hyderabad Rename : हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार!

Hyderabad Rename : हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार!

हैदराबाद : तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे (Hyderabad) नाव भाग्यनगर (Bhagyanagar) करू, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी केला आहे.


‘‘ज्या पद्धतीने बॉम्बे, मद्रास, कलकत्ता या शहरांची नावे बदलण्यात आली, त्याचप्रमाणे हैदराबादचेही भाग्यनगर करण्यात येईल. हा हैदर कोण होता? कुठून आला होता? अशा व्यक्तींच्या नावांची आपल्याला गरज आहे का? आमची सत्ता आल्यास आम्ही हैदराबादचे नाव नक्की बदलू. गुलामीची मानसिकता दर्शविणारी प्रतिके आणि नावे बदलण्यात कोणती अडचण आहे,’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'भाग्यनगर' या नावातच भरभराट आहे, असे रेड्डी म्हणाले.

Comments
Add Comment