मुंबई: थंडीचा मोसम सुरू होताच अंड्याच्या सेवनाचे प्रमाण वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन आणि अन्य पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे थंडीपासून बचाव होण्यास मदत मिळते. मात्र बाजारात खोटी अंडी मिळत आहेत. खोटी अंड्यांमध्ये केमिकल, रबर तसेच अन्य पदार्थ मिसळलेले असतात. नकली अंडी खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपण जी अंडी खात आहोत की खरी आहेत की खोटी हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. अंड्याचा खरेपणा ओळखण्यासाठी तुम्ही काही ट्रिक वापरू शकता
कवच तपासा
खऱ्या अंड्याचे कवच ते ह मजबूत आणि थोडेसे पिवळसर सते. मात्र खोट्या अंड्याचे कवच पातळ, धुंदसर अथवा सफेद असू शकते. तसेच याचे कवच अगदी सहज फुटते तर खऱ्या अंड्याचे कवच फोडण्यासाठी थोडी जास्त ताकद लावावी लागते.
वजन तपासा
अंड्याचा खरेपणा तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे त्याचे वजन तपासा. जेव्हा तुम्ही एखादे अंडे हातात घेता तेव्हा खरे अंडे हे वजनाला हलके असते.
पाण्यात टाकून तपासा
अंडी खरे आहेत की खोटी हे तपासण्याचा सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे ते पाण्यात टाकून पाहा. एका भांड्यात पाणी घेऊन त्याल अंडी टाका. जर अंडे पाण्यात बुडाले तर ते खरे आहे. मात्र जर ते पाण्यावर तरंगू लागले तर ते खोटे अंडे आहे. खोट्या अंडीमध्ये हवा, प्लास्टिक अथवा माती भरलेली असते ज्यामुळे त्याचे वजन हलके होते आणि ते पाण्यावर तरंगतात.