
नवी दिल्ली: आज सकाळी-सकाळी जगातील तीन देशांमध्ये भूकंपाचे(earthquake) जोरदार झटके बसले. यात पापुआ न्यू गिनी(Papua Nueva Guinea), चीन(china) आणि पाकिस्तान(pakistan) यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने ही माहिती दिली आहे. पापुआ न्यू गिनीच्या उत्तरी किनारी भाात ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके बसले. हे भूकंपाचे झटके किनाऱ्यापासून साधारण २० किमी दूर प्रशांत महासागराच्या पूर्व सेपिक प्रांताची राजधानी वेवाक शहरापासून दूर जाणवले.
याशिवाय भारताचे दोन शेजारील देश पाकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाने जमीन हादरली. चीनच्या जिजांग येथे ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. तर दुसरीकडे पाकिस्तानात लोकांना ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, तीनही देशांतून कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही.
Earthquake swarm strikes Pakistan, New Guinea, Xizang in early Tuesday hours
Read @ANI Story | https://t.co/11Q4uoWJdh#Earthquake #NewGuinea #Pakistan pic.twitter.com/PvBkHrX2nL
— ANI Digital (@ani_digital) November 28, 2023
भारताच्या शेजारील देशात भूकंपाचे झटके
पाकिस्तानात सकाळी ३.३८ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार झटके बसले. दुसरीकडे चीन आणि पापुआ न्यू गिनीमध्ये ३.४५ आणि ३.१६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी भारताचे शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले होते.
या भूकंपात नेपाळमधील तब्बल १५७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर हजारो लोक जखमी झाले होते. या दरम्यान भारत सरकारने नेपाळला भरपूर मदत केली आणि सामना पाठवले होते. याशिवाय मोठ्या संख्येने जखमी झालेल्या अनेक नागरिकांवर भारतात उपचार करण्यात आले होते.