जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक
मुंबई : गेल्या महिन्याभरात मुंबईतील हजारो बांधकामे, वाढलेली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेली वाहनांची संख्या, उद्योगांतून बाहेर पडणारे विषारी वायू यांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality) प्रचंड खालावली होती. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) ३०० च्या पार पोहोचला होता, जो अत्यंत खराब हवा दर्शवतो. त्यात भर पडली ती दिवाळीत (Diwali) मनसोक्त फोडलेल्या फटाक्यांची. वारंवार सूचना देऊनही मुंबईकरांनी हवे तसे फटाके फोडले. त्यामुळे हवेची गुणवत्ता पातळी आणखी खालावली. मात्र, नुकताच झालेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) मुंबईकरांसाठी देवदूत ठरला आहे. पावसामुळे मुंबईतील हवा चांगलीच सुधारली आहे.
रविवारी मुंबई उपनगरासह राज्यातही विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली येण्यास मदत झाली आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI १००च्या खाली आहे. बीकेसीचा AQI १०३ वर आहे. आज देखील मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे.
जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक
एकूण मुंबई – ६० AQI
कुलाबा – ७६
भांडुप – ३७
मालाड – ३५
माझगाव – ४७
वरळी – ३३
बोरिवली – ६५
बीकेसी – १०३
चेंबूर – ८९
अंधेरी – ६७
नवी मुंबई – ५३
हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?
० ते ५० AQI – उत्तम
५० ते १०० AQI – समाधानकारक
१०१ ते २०० AQI – मध्यम
२०१ ते ३००० AQI – खराब
३०१ ते ४०० AQI – अतिशय खराब
४०१ ते ५०० AQI – गंभीर